rajendra bhosale ahmednagar Zilla Parishad Inspection of old building by authorities  sakal
अहिल्यानगर

निधी मिळण्याचा मार्ग सुकर ;जिल्हा परिषद; जुन्या इमारतीची अधिकाऱ्यांकडून पाहणी

जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता प्रशासनाला पाच कोटींची आवश्‍यकता आहे

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता प्रशासनाला पाच कोटींची आवश्‍यकता आहे. या कामासाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना आता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची साथ मिळणार आहे. तसे सूतोवाच त्यांनी केले. त्यामुळे या इमारतीसाठी निधी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

बडोदा संस्थानातील कर्तृत्ववान संस्थानिक, पुरोगामी विचारांचे कल्याणकारी राजे श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड यांनी स्वखर्चातून लोकल बोर्डासाठी इमारत बांधून दिली होती. लोकल बोर्डानंतर जिल्हा परिषद अस्तित्वात आली. अशा या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सुमारे पाच कोटींची मागणी या कामासाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचा विषय सर्वांसमोर आलेला आहे. शिवजयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली. या वेळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर आदी उपस्थित होते.

शिवजयंती कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक जिल्हा परिषदेत एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांनी या वेळी जिल्हा परिषदेच्या जुन्या वास्तूची पाहणी केली, तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाची पाहणी केली. या इमारतीला निधी मिळवून देण्यासाठी आपले सहकार्य राहिले, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT