Rare paradise fly catcher bird was found in Bhandardara reservoir area
Rare paradise fly catcher bird was found in Bhandardara reservoir area Sakal
अहमदनगर

भंडारदरा जलाशय परिसरात आढळला दुर्मिळ स्वर्गीय नर्तक पक्षी

शांताराम काळे

अकोले (जि. अहमदनगर) : भंडारदरा जलाशय जवळील प्रवरा नदीच्या परिसरात दुर्मिळ स्वर्गीय नर्तक पक्षाचा वावर कळसूबाई अभयारण्यात पक्षाचा वावर असण्याचा तज्ज्ञाचा अंदाज आहे. कळसूबाई परिसरातही पक्षी निरीक्षकांना हा पक्षी आढळल्याची नोंद आहे. दरम्यान गीते हे कळसूबाई अभयारण्यात येथील वनपाल म्हणून कार्यरत आहेत. ते भंडारदरा परिसरात प्रवरा नदीतीरावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना लांब शेपटी आणि पांढऱ्या रंगाचा स्वर्गीय नर्तक पक्षी (प्याराडाइज फ्लाय केचर) दिसला.  सुमारे तासभर या स्वर्गीय नर्तक नराचे निरीक्षण त्यांनी केले. यावेळी त्यांना या पक्षाची मादीही आढळून आली.

असा असतो स्वर्गीय नर्तक पक्षी..

या पक्षाच्या दोन प्रजाती आहेत. एक जात भारतात तर दुसरी जात श्रीलंकेत आढळते. नराला लांब शेपूट असते, त्यामुळे तो अतिशय देखणा दिसतो. पूर्ण वाढ झालेला नर पांढऱ्या रंगाचा असतो, तर लहान नर आणि मादी लाल रंगाची असते. स्वर्गीय नर्तकाची मान व चोचीकाडील भाग काळपट गडद रंगाचा असतो. डोक्यावर लहान तुरा, दोन पिसाची दीड फुट लांब असणारी शेपटी यामुळे त्याचे सौदर्य अधिक खुलून दिसते. मध्यप्रदेशचा राज्य पक्षी म्हणून ओळख

स्वर्गीय नर्तकचा वावर मुख्यतः उत्तर प्रदेश मधील जंगलात आढळतो. मध्य प्रदेशचा ‘राज्य पक्षी’ म्हणून स्वर्गीय नर्तकची ओळख आहे. मध्यप्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानात स्वर्गीय नर्तक मोठ्या प्रमाणात आढळतो. हिंदीमध्ये त्याचे ‘दुधराज’असे नाव आहे ‘स्वर्गीय नर्तक’ हवेत संचार करताना शेपटी मधील दोन पिसांची हालचाल कापडी रिबन हवेमध्ये फिरवल्यासारखी सुंदर दिसते .लहान किडे, अळ्या हा स्वर्गीय नर्तकचा प्रमुख आहार आहे .हा पक्षी परीसरातही पक्षी निरीक्षकांना आढळून आला आहे .पक्षाचे भंडारदरा परिसरात पहिल्यांदाच दर्शन झाल्यामुळे आनंद झाला. मध्यप्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानात स्वर्गीय नर्तक मोठ्या प्रमाणात आढळतो. दुर्मिळ स्वर्गीय नर्तक मुळचं याचं अस्तीत्व सह्याद्रीतील असुन काही कालावधीसाठी दख्खनच्या पठारांवर स्थलांतर करतात .हवेत उडुन किडे याचं आवडत खाद्य. उडत असताना लांबदार शेपटी असलेला हा पक्षी पंतगासारखा दिसत असल्याने जणु काही नाचतच असल्याचा भास होतो. दाट झाडीत रहायला आवडते .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT