तलाठी कार्यालय. ई सकाळ
अहिल्यानगर

राशीनचे तलाठी, ग्रामविकास अधिकारीच कोरोनाविषयी अनभिज्ञ

दत्ता उकिरडे

राशीन : कोरोना बाधित व बरे झालेल्या रूग्णांची संख्या, सर्व्हे, प्रत्येक प्रभागातील स्थिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना यासह विविध प्रश्‍नांना ठोस उत्तरे न देता आल्याने तलाठी प्रशांत गोंदचर व ग्रामविकास अधिकारी कैलास तरटे यांना उपसरपंच शंकर देशमुख व मनसेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रसाद मैड यांनी चांगलेच धारेवर धरले. तर देशमुख यांनी गटविकास अधिकारी अमोल जाधव व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना लक्ष्य करीत कोरोनाबाबत प्रशासन ढीम्म असल्याचा आरोप केला. (Rashin's officials do not know the number of Corona patients)

माझं गाव माझी जबाबदारी अंतर्गत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विविध समित्या स्थापन करण्यासाठी मंडलाधिकारी पी. ए. पाचारणे यांनी जिजाऊ मंगल कार्यालयात बैठक आयोजित केली होती. तीत सरपंच नीलम साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप व्हरकटे, ऍड. युवराज राजेभोसले, अमोल जाधव, दीपक थोरात, श्रीकांत साळवे यांच्यासह अंगणवाडी आणि आशा सेविका उपस्थित होत्या.

तालुका प्रशासनाने कोरोना समितीच्या सचिवाचीच नेमणूक न केल्याने कोरोना प्रतिबंधक उपायांसाठी कोणतीच बैठक घेता आली नाही तसे नियोजनही करता आले नाही. ग्रामविकास अधिकारी व तलाठी हे कोरोना समितीच्या सचिव पदाची टोलवाटोलवी करीत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. तर मैड यांनी कोरोनाबाबतची आकडेवारी व उपाययोजना काय केल्या हे प्रथम दाखवा असा पवित्रा घेतला.

कोरोनाची रूग्णसंख्या आटोक्‍यात ठेवण्यासाठी व संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कुटूंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष पथक, वाहन चालक पथक, कोविड 19 डॉक्‍टर हेल्पलाईन पथक, कोविड 19 लसीकरण पथक या पाच पथकांची निवड करण्यात आली.

स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी द्या

दोन वर्षांपासून राशीनला स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी नाही, त्यामुळे 25 हजार लोकसंख्येच्या गावचा कारभार सुरळीत करण्यात अडचणी येत असल्याने राशीनला स्वतंत्र ग्रामविकास अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी उपसरपंच शंकर देशमुख यांनी केली आहे.(Rashin's officials do not know the number of Corona patients)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कोल्हापुरात माॅन्सूनचे धडाक्यात पुनरागमन; पुढच्या काही तासांत मुंबईसह अमरावती, कोकणात पावसाचा जोर वाढणार; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी

Anant Ambani : अनंत अंबानी यांची तिरुमलात सुप्रभात सेवा

Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

SCROLL FOR NEXT