Chikungunya and Dengue disease sakal
अहिल्यानगर

Dengue Chikungunya disease : चिकनगुणियावर `देशी’ चा उतारा? ‘सांधेदुखी’वर गावठी उपचाराचे प्रयोग : शास्त्रीय आधार नाहीच

Dengue Chikungunya disease : अहमदनगर जिल्ह्यात चिकनगुन्या सदृश आजाराचे रुग्ण वाढत असल्याने काही रुग्णांनी गावठी उपचारांना प्राधान्य दिले आहे, परंतु यामागे कोणताही शास्त्रीय आधार नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्यात चिकनगुन्या सदृश आजाराचे रुग्ण वाढत आहेत. या आजाराने थैमान घातले आहे. गल्लो गल्ली नव्हे, तर घरोघरी चिकनगुन्या, डेंगी सदृश आजाराचे रुग्ण आहेत. रुग्णालयात जाण्याऐवजी काही रुग्णांनी गावठी उपचारांवर भर दिला आहे.

त्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे उपाय केले जात आहेत. काहीजण तर मद्याचा उपाय सूचवत आहेत. त्यास सुशिक्षित मंडळीही बळी पडताना दिसतात. दरम्यान, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. रुग्णांनी असे प्रयोग करू नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.

ग्रामीण भागात गावठी उपचार घेण्यावर लोकांचा भर आहे. शहरी भागातही याचे लोण पसरले आहे. कोणताही वैज्ञानिक आधार नसताना लोकांना हा गावठी उपचार जवळचा वाटू लागला आहे. घरात एकापेक्षा जास्त रुग्ण असल्याने कुटुंबप्रमुख वैतागले आहेत. विशेषतः लहान मुले व वृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे.

डेंगीवर उपचार केल्यानंतर रुग्ण बरा होतो. मात्र, चिकनगुणियावर उपचार केल्यानंतरही सांधेदुखीचा त्रास जाणवतो. काही लोकांना तर दोन ते तीन महिने हा त्रास जाणवत आहे. त्या त्रासापासून बचाव करण्यासाठी विविध गावठी उपचार घेताना दिसतात.

काही जणांनी झाडपाल्याचा आधार घेतल्याचे दिसते, तर काही जणांनी चक्क देशी मद्य अंगाला चोळण्याचा अघोरी उपचार सूचवला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकही त्या उपचाराला भुलले आहेत. मद्यात कापूर टाकून ते अंगाला लावले जात असल्याचे समोर आले आहे. हा उपचार केल्यानंतर किती आराम मिळतो, हा संशोधनाचा विषय आहे. कोणताही शास्त्राधार नसताना रुग्ण गावठी उपचाराकडे वळले आहेत, हे विशेष.

चिकनगुणिया सारख्या आजारामुळे अंगाला मद्य चोळण्याचे प्रकार हे अघोरी आहेत. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. रुग्णांनी अशा प्रयोगात वेळ घालू नये. आजाराची लक्षणे असल्यास तातडीने आपल्या डॉक्टराकडून तपासणी करून घ्यावी.

- डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT