The rotation escaped from the radish dam 
अहिल्यानगर

मुळा धरणातून आवर्तन सुटले, असे असेल टाईमटेबल

विलास कुलकर्णी

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आज (सोमवार) सकाळी सहा वाजता उन्हाळी हंगामातील सिंचनासाठीचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. 707 क्‍यूसेकने सोडलेले हे आवर्तन टप्प्याटप्प्याने 1500 क्‍यूसेकपर्यंत वाढविले जाईल, अशी माहिती मुळा धरणाचे शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांनी दिली. 
मुळा धरणात आज अखेर 20 हजार 450 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

अचल साठा वगळता 15 हजार 950 दशलक्ष घनफूट पाणी धरणात उपलब्ध आहे. उजव्या कालव्याद्वारे राहुरी, पाथर्डी, नेवासे व शेवगाव तालुक्‍यांतील तीस हजार हेक्‍टर क्षेत्रासाठी हे आवर्तन सोडण्यात आले. चाळीस दिवस चालणाऱ्या या आवर्तनासाठी 4500 दशलक्ष घनफूट पाणी वापर होईल. 

वांबोरी उपसा पाणी योजनेसाठी 15 फेब्रुवारीपासून आवर्तन सुरू आहे. ते शंभर दिवस चालेल. त्यासाठी 680 दशलक्ष घनफूट पाणी मंजूर आहे. राहुरी, नगर, नेवासे व पाथर्डी तालुक्‍यांतील 101 गाव तलाव त्यातून भरून घेण्यात येणार आहेत. पाणीपट्टी जमा करणाऱ्या गावांतील तलावांत पाणी सोडण्यास प्राधान्य देण्याचे धोरण पाटबंधारे विभागाने ठेवले आहे. त्यामुळे, आतापर्यंत 42 तलावांमध्ये पाणी पोहोचले आहे, असेही आंधळे यांनी सांगितले. 

दोन्ही कालव्यांसाठी पाच आवर्तने 
डाव्या कालव्यांतून शुक्रवारपासून (ता. 5) सोडलेले आवर्तन 26 मार्चपर्यंत चालेल. त्यातून राहुरी तालुक्‍यातील साडेतीन हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या आवर्तनासाठी पाचशे दशलक्ष घनफूट पाणी वापर होईल. उन्हाळी हंगामातील सिंचनाचे उजव्या कालव्याद्वारे दोन; तर डाव्या कालव्याद्वारे तीन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकदा आरक्षणाचा फायदा घेतला तर खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी! राज्यात ९००० शिक्षकांची भरती; मे २०२६ पर्यंतची रिक्त पदे भरणार; पवित्र पोर्टलद्वारेच भरती प्रक्रिया; ‘टीईटी’चा निकाल याच महिन्यात

फलटण तालुका हादरला! सस्तेवाडीत मध्यरात्रीत एकाचा खून; दोघांना अटक, शेतात ससे पकडण्यास गेला अन् काय घडलं?

आजचे राशिभविष्य - 07 जानेवारी 2026

Cafe Style Grilled Sandwich: कॅफेस्टाइल ग्रिल सँडविच बनवा आता घरच्या घरीच ! फक्त तवा अन् ‘ही’ सोपी ट्रिक वापरा

SCROLL FOR NEXT