शेवगाव : अंबरनाथ (जि. ठाणे) येथून चोरीला गेलेली स्कूल बस उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या पथकाने ताब्यात घेतली. पोलिसांचा सुगावा लागताच चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.
नवी मुंबई येथील रहिवासी संतोष गणपत घनवट यांची स्कूल बस (एमएच 03 2709) अंबरनाथ (जि. ठाणे) येथून चोरीस गेली. याबाबत घनवट यांनी अंबरनाथ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिस तपासात ही बस नगरच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्याने, अंबरनाथ पोलिसांनी नगर पोलिसांना माहिती दिली.
ही स्कूल बस शेवगाव येथे नेवासे रस्त्यावर उभी असल्याची माहिती आज उपविभागीय पोलिस अधिकारी मुंडे यांना समजली. मुंडे, तसेच पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी पथकासह नेवासे रस्त्यावर धाव घेतली. या वेळी त्यांना त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाजवळ ही स्कूल बस उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच चोरट्यांनी तेथून पोबारा केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.