MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

MI vs KKR IPL 2024
MI vs KKR IPL 2024 esakal

MI vs KKR IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा वानखेडेवर 24 धावांनी पराभव केला. याचबरोबर केकेआरने 14 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. ते प्ले ऑफच्या जवळ पोहचले आहेत. मात्र मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफ गाठण्याच्या आशेवर पाणी फिरलं आहे.

मुंबईचे चाहते त्यांचा संघ प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर पडल्यामुळं नाराज झाले आहे. मात्र याचा फायदा थेट भारतीय संघाला होणार आहे. मुंबईचा संघ प्ले ऑफ मधून बाहेर पडणं हे वर्ल्डकपची तयारी करणाऱ्या भारतीय संघाच्या पथ्यावरच पडणार आहे.

MI vs KKR IPL 2024
PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

भारतीय संघातील चार प्रमुख खेळाडू रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतात. हे चारही खेळाडू प्लेईंग 11 मध्ये स्थान निश्चित असलेले खेळाडू आहेत. मुंबई प्ले ऑफमधून बाहेर पडल्यामुळं हे सर्व खेळाडू 17 मे रोजी आपला आयपीएलचा शेवटचा सामना खेळतील. त्यामुळे त्यांना अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपची तयारी करण्यासाठी जवळपास 3 आठवडे मिळतील.

दुखापती

हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी दुखापतींनी त्रस्त होते. हार्दिक हा जवळपास 5 महिने संघाबाहेर होता तर सूर्या हा 3 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. याचा विचार केला तर या दोघांना आयपीएलनंतर उपयुक्त अशी विश्रांती मिळणार आहे. मुंबई इंडियन्स देखील आता या खेळाडूंना फार लोड देणार नाही. बुमराहला देखील यापूर्वी मोठी दुखापत झाली होती. त्याला देखील आता विश्रांती घेण्याची संधी मिळेल.

MI vs KKR IPL 2024
PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

फिटनेस

रोहित शर्मा हा गेल्या डिसेंबरपासून सातत्यानं क्रिकेट खेळत आहे. त्याला विश्रांतीची आणि फिटनेस रिगेन करण्यासाठी उसंत हवी आहे. ही उसंत त्याला आयपीएलनंतर मिळणार आहे. हार्दिक आणि बुमराह यांचा देखील वर्कलोड मॅनेज केला जाईल त्यामुळे त्यांना फिटनेसवर जास्त भर देता येईल.

रोहित शर्मा, बुमराह, पांड्या आणि सूर्या यांचे लवकर अमेरिकेत जाण्यामुळे टीम इंडियाला तेथील खेळपट्ट्या पाहून आपली रणनिती आखण्यात मोठा फायदा होणार आहे. हे सर्व खेळाडू संघाच्या लिडर ग्रुपमध्ये असल्यामुळं त्याचा फायदा संघाला होऊ शकतो.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com