अहिल्यानगर

Sharad Pawar: पवारांनी भाकरी फिरवली! विधानसभेचा उमेदवार ठरला ? रोहित पाटलांपाठोपाठ आणखी एका तरुणाला देणार संधी

Maharashtra Assembly Elections: शरद पवारांचे हे वक्तव्य आणि उमेदवारीचे संकेत आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात मोठ्या बदलांचे संकेत देत आहेत. अमित भांगरे यांच्या उमेदवारीमुळे अकोलेच्या राजकारणात नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sandip Kapde

who is Amit Bhangare

शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. आ. किरण लहामटे यांनी साथ सोडल्यानंतर शरद पवारांनी अकोले विधानसभेत नवी खेळी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी एका शेतकरी मेळाव्यात अकोले विधानसभा मतदारसंघातील जनतेला आवाहन केले की, "आमदार किरण लहामटेला खाली बसवा आणि अमित भांगरेच्या मागे शक्ती उभी करा."

शरद पवारांचे आवाहन-

शरद पवार यांनी आपल्या भाषणात अमित भांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना समर्थन देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "तुमची मदत असेल तर अकोल्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही." त्यांनी पाच वर्षांपूर्वी आमदार किरण लहामटे यांना निवडून दिल्याचे सांगितले. "मला वाटलं साधा माणूस आहे, शब्दाला किंमत देईल," असे ते म्हणाले. परंतु, लहामटे यांनी शरद पवारांची साथ सोडून मुंबईत जाऊन दुसऱ्या पक्षात सामील झाल्याचे त्यांनी नमूद केले.

नवीन नेतृत्वाची गरज-

शरद पवारांनी लहामटेंवर टीका करताना असे म्हटले, "कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला विधानसभेत बसवायची वेळ आलीय." त्यांनी अमित भांगरे यांच्या मागे शक्ती उभी करण्याचे आवाहन केले. "या तरुणाच्या पाठीशी शक्ती उभी करा. तरुणांच्या ताकदीवर अकोले आणि महाराष्ट्रातले राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही," असे त्यांनी सांगितले.

शरद पवारांचे हे वक्तव्य आणि उमेदवारीचे संकेत आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात मोठ्या बदलांचे संकेत देत आहेत. अमित भांगरे यांच्या उमेदवारीमुळे अकोलेच्या राजकारणात नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोण आहेत अमित भांगरे?

अमित भांगरे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अशोक भांगरे यांचे पुत्र आहेत. अमित यांच्या आई, सुनिता भांगरे, जिल्हा परिषद सदस्य राहिल्या आहेत. अमित भांगरे हे पिचाडांच्या कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. पिचाडांनी शरद पवारांची साथ सोडली असताना, अशोक भांगरे मात्र शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. किरण लहामटे यांना निवडून आणण्यात अमित भांगरे यांचा मोठा वाटा होता.

गेल्या विधानसभेत अशोक भांगरे इच्छुक होते, पण त्यांनी शरद पवारांचा शब्द पाळून किरण लहामटे यांना मदत केली होती. अमित भांगरे हे शरद पवार गटाच्या अहमदनगर जिल्ह्याचे युवक अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत पिचड-लहामटे महायुतीत असताना, महाविकास आघाडीला ५८ हजारांचे लीड मिळाले होते आणि शिर्डीचे मविआचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे निवडून आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT