Shirdi sai sansthan sakal
अहिल्यानगर

Shirdi News : साईसंस्थानमधील ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय; ४० टक्के मिळाली वेतनवाढ

राज्य सरकारच्या स्तरावर आपण सातत्याने पाठपुरावा केल्याने साईसंस्थानच्या आकृतिबंधातील मंजूर पदांवर नियुक्त असलेल्या ५९८ कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला.

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी - राज्य सरकारच्या स्तरावर आपण सातत्याने पाठपुरावा केल्याने साईसंस्थानच्या आकृतिबंधातील मंजूर पदांवर नियुक्त असलेल्या ५९८ कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता यापुढे चाळीस टक्के वेतनवाढ दिली जाईल. त्याबाबतचे आदेशदेखील जारी करण्यात आलेत. या कर्मचा-यांना सेवेत कायम करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली.

पत्रकात म्हटले आहे, की यापूर्वी आपण विधी व न्याय मंत्री असताना १०५२ कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत कायम करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आता उर्वरित कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्तिगत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यास यश आले असून, विधी व न्याय विभागाने शासनादेश जारी करून ही ४० टक्के वेतनवाढ देण्यास कोणतीही हरकत नसल्याचे संस्थानला कळविले आहे.

या निर्णयामुळे या कंत्राटी कर्मचा-यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आपण त्यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT