shirdi sakal
अहिल्यानगर

शिर्डी : हरीच्या दारी रंगले राजकारणातले वारकरी

गंगागिरी महाराजांच्या हरिनाम सप्ताहाला राजकीय नेत्यांच्या सहभागाची परंपरा

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : पावणेदोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या सद्‍गुरू गंगागिरी महाराजांच्या हरिनाम सप्ताहानिमित्त गोदाकाठच्या कोकमठाणात वैष्णवांचा मेळा भरला अन् भक्तीचा मळा फुलला. जशी गर्दी दाटली, तशी दिग्गज राजकारण्यांची लगबगदेखील सुरू झाली. काल (मंगळवारी) पहिल्याच दिवशी आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी विवेक कोल्हे यांनी एकमेकांशेजारी बसून महंत रामगिरी महाराजांच्या रथाचे सारथ्य करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हे दोघेही नेते सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष आहेत. एका अर्थाने ते या वारकऱ्यांच्या महाकुंभाच्या आयोजनाचे सारथीदेखील आहेत, हे कालच्या त्यांच्या सारथ्यावरून दिसून आले. रोज लाखोंची गर्दी आणि सोबतीला राजकारणातील दिग्गज दर्दी, हे या सप्ताहाचे फार पूर्वींपासूनचे वैशिष्ट्य राहिले आहे.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार बाळासाहेब थोरात हे दोन्ही एका पक्षात आणि एका मंत्रिमंडळात होते तेव्हापासूनचे प्रतिस्पर्धी आहेत. या हरिनाम सप्ताहात काल्याच्या कीर्तनाला अक्षरशः लाखो भाविक जमतात. त्यांच्या साक्षीने हे दोन मातब्बर नेते व्यासपीठावर येऊन हरीच्या नावे हमखास फुगडी खेळतात.

या दोघांनीही आपापल्या मतदारसंघांत यापूर्वी या सप्ताहाचे भव्यदिव्य आयोजन केले. या सप्ताहात हरीच्या नावे भक्तीचा मळा फुलतो. त्यातून लोकप्रियतेची आणि आपुलकीची चार फुले सहज गोळा करता येतात. मतांची बेगमी आणि जनतेच्या मनात स्थान निर्माण करता येते. त्यामुळे राजकारणातले हे दिग्गज वारकरी हरीच्या दरबारात दान करणे अन् लीन होणे पसंत करतात.

माजी खासदार दिवंगत बाळासाहेब विखे, माजी खासदार दिवंगत शंकरराव काळे, माजी आमदार दिवंगत शंकरराव कोल्हे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गंगापूरचे आमदार रामकृष्णबाबा पाटील, खासदार साहेबराव पाटील डोणगावकर, वैजापूरचे माजी

आमदार आर. एम. वाणी, विद्यमान आमदार रमेश बोरनारे, श्रीरामपूरचे माजी आमदार दिवंगत जयंत ससाणे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी आजवर या हरिनाम सप्ताहाचे कधी ना कधी आयोजन केले, अथवा त्यात हिरीरिने भाग घेतला आहे

तीन जिल्ह्यांच्या सीमाभागावर प्रभाव

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, कन्नड आणि नाशिक जिल्ह्यातील येवला या तालुक्यांतील भाविकांवर आणि पर्यायाने तेथील नेत्यांवर या सप्ताहाचा मोठा प्रभाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT