In Shirdi a woman died on the spot after a cable fell on her 
अहिल्यानगर

केबल अंगावर पडून शिर्डीत महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी (अहमदनगर) : सरपणासाठी फळ्या तोडताना त्याला गुंडाळलेला महाकाय केबलच्या वजनदार वेटोळ्याखाली दबून एक महिला जागीच ठार झाली. तिच्या सोबत असलेला आठ वर्षे वयाचा मुलगा सुदैवाने बजावला. 

शिर्डीतील एका बंद असलेल्या हॉटेलच्या आवारात हि दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शी असलेले पुणतांबा येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चव्हाण यांनी मदतीसाठी तेथे धाव घेतली. स्वयंपाकासाठी सरपण मिळविण्यासाठी हि महिला केबल गुंडाळलेल्या रिळाच्या वाळलेल्या फळ्या तोडत होती. फळ्या तुटल्याने महाकाय केबलचे वजनदार वाटोळे ढिले झाले. आणि अचानक या महिलेच्या अंगावर आले. क्षणार्धात ती त्याखाली दबली गेली. 

योगायोगाने समोरील एका इमारतीच्या गॅलरीत उभे असलेल्या चव्हाण यांच्या डोळ्यासमोर ही घटना घडली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संपर्क साधल्यानंतर पोलिस देखील दाखल झाले. ही वजनदार केबल बाजुला करण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. त्यानंतर या महिलेला साईसंस्थान रूग्णालयात हलविण्यात आले. डॉक्‍टरांनी ती मृत झाल्याचे घोषीत केले. लता बाबासाहेब पाडेकर (वय 45) असे या महिलेचे नाव आहे. तिच्यासोबत असलेला सौरभ पवार हा आठ वर्षे वयाचा मुलगा फळ्या तोडण्यासाठी मदत करीत होता. तो सुदैवाने बचावला, असे चव्हाण यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

SCROLL FOR NEXT