मोहन पालवे ई सकाळ
अहिल्यानगर

शिवसेनेच्या मोहन पालवेंचे निधन, ड्रायव्हर ते जिल्हा परिषद सदस्य

राजेंद्र सावंत

पाथर्डी : नगर जिल्हा परिषदेतील तीन आजी-माजी सदस्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. यात पाथर्डी तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले जाणाऱ्या मोहन जीवनाजी पालवे (वय ६५) यांची प्राणज्योत मालवली. (Shiv Sena leader Mohanrao Palve passes away)

तालुक्यातील करंजी-मिरी जिल्हा परिषद गटाचे गेली पंधरा वर्षे नेतृत्व केलेले व शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख म्हणून मोहन पालवे नगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. गेल्या पंधरा दिवसांपासून ते कोरोना झाल्यामुळे मृत्यूशी झुंज देत होते.

उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर मोठी निष्ठा आणि श्रद्धा असणाऱ्या मोहन पालवे यांच्या निधनामुळे पाथर्डी तालुक्यातून मोठे दुख व्यक्त करण्यात येत आहे. गावागावात त्यांनी शिवसेनेची शाखा काढली होती. एकाच गटातून ते पंधरा वर्षे सदस्य राहिले.

त्यांच्या पश्‍चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सलग पंधरा वर्ष त्यांनी मिरी-करंजी जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व केले होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यांनी राजकारणामध्ये एक मानाचे स्थान मिळवले होते. एक ट्रक ड्रायव्हर ते जिल्हा परिषद सदस्य असा त्यांचा जीवनाचा प्रवास राहिला. गुरुवारी रात्री उशिरा कोल्हार या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंतकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले.(Shiv Sena leader Mohanrao Palve passes away)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Cold Wave : महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा असा असेल पुढील अंदाज

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न

Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा

माेठी बातमी! सातारा जिल्ह्यातील ड्रग्‍ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे?; विशाल मोरेसह सात जणांना अटक, कोण आहे सलीम डोला?

Railway : पुणे-मुंबई-पुणेची ‘प्रतीक्षा’ संपली; लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT