Shrigonda case unraveled
Shrigonda case unraveled 
अहमदनगर

प्रेयसीवर अतिप्रसंग करणाऱ्याचे प्रियकराने लिंगच कापलं

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : आढळगाव येथील मुकुंद वाकडे खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी दत्तात्रेय अंकुश पठाडे (वय 27) याला अटक करण्यात आली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, उपअधीक्षक संजय सातव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, निरीक्षक दौलत जाधव, सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी आज आढळगाव येथे भेट दिली.

पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाबाबत प्रसिद्धिपत्रक दिले. पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी याबद्दल माहिती दिली. आढळगाव येथील मुकुंद वाकडे या तरुण शेतकऱ्याचा निर्घृण खून झाला होता. स्थानिक खबरी आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले.

आरोपीने गुन्ह्याची कबुली देत घटनाक्रम कथन केला. 
मृताच्या नातेवाईक महिलेचे आरोपी पठाडे याच्याशी अनैतिक संबंध होते. मुकुंद नातेवाईक महिलेला शरीरसंबंंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करीत होता. त्या महिलेवर त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नही केला. ही माहिती त्या महिलेने आरोपीला दिली. त्याने मुकुंदला धडा शिकवण्याचे ठरवले.

त्या दिवशी मुकुंद घरातून बाहेर पडल्यानंतर संबंधित महिलेने पठाडेला मोबाईलवरून कॉल केला. तिने मुकुंदला "समजावून सांगण्याची' चिथावणी दिली. त्यामुळे पठाडे हा मुकुंदचा काटा काढण्याच्या तयारीत होता.

त्याने मुकुंदचा पाठलाग केला. त्या अतिप्रसंगाच्या घटनेबाबत जाब विचारू लागला. त्यातून त्यांच्यात झटापट झाली. चिडलेल्या पठाडेने मुकुंदच्या छातीवर चाकूने वार केला. तो पळून जाऊ लागल्यावर पठाडेने पाठलाग करीत त्याला पकडले आणि गळ्यावर वार केला. त्याचा मृत्यू झाल्यावर आरोपीने सूडबुद्धीने त्याचे गुप्तांग कापले. 

फाटलेला खिसा आणि मोबाईल कॉल 
पठाडेला ताब्यात घेतल्यावर तेथील एका विहिरीत चाकू, अंगावरील कपडे टाकल्याचे त्याने दाखविले. त्यात पठाडेच्या जॅकेटवर रक्ताचे डाग आहेत. याच जॅकेटचा खिसा मुकुंदसोबत झालेल्या झटापटीत फाटल्याने घटनास्थळी पडलेला पोलिसांना मिळाला होता. हा खिसा, तसेच पठाडेला मुकुंदच्या नातेवाईक महिलेने केलेला शेवटचा कॉल तपासात निर्णायक ठरला. 

या प्रकरणात मृताच्या नातेवाईक महिलेलाही आरोपी केले जाणार आहे. या खुनात तिची चिथावणी असल्याचे सिद्ध होत आहे. 
- संजय सातव, पोलिस उपअधीक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT