श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरासह तालुक्यात नव्याने १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. न्यायालयीन कोठडीतील चार कैद्यांसह येथील संजयनगर, प्रभाग चार, प्रभाग एक व दोनसह बेलापूर येथील एका कुटुंबातील नऊ रुग्णांचा त्यात समावेश आहे. कोरोनामुळे काल शहरातील एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता २०६ वर पोहचली आहे.
आजपर्यंत सहा कोरोनाबाधितांसह दोन संशयीतांचा मृत्यु झाला. शहरातील अनेक भागासह ग्रामीण भागातील वडाळा महादेव, बेलापूर, गोवर्धनपूर, सराला, गळनिंब, अशोकनगर, भोकर, पढेगाव, दत्तनगर, खंडाळा परिसरात कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. तालुक्यात यापुर्वी महाराज, आमदार, राजकीय पदाधिकारी, युवानेत्यासह अनेकांना कोरोनाची बाधा झाली. त्यात भर आज कैद्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या १० कैद्यांची रॅपीड तपासणी करण्यात आली. त्यात चार कैदी कोरोना पॉझिटीव्ह आले असुन ४० कैद्यांची तपासणी केली जाणार आहे. प्रारंभी शहरासह तालुक्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद येथुन आलेल्या नागरीकांना कोरोनाची बाधा झाली होती. आता लाकडाउन शिथील झाल्यानंतर सर्वत्र गर्दी वाढली आणि कोरोनाचा समुह संर्सग सुरु झाला.
गेल्या एक महिन्यात १५० हुन अधिक स्थानिक नागरीकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढला आहे. आरोग्य विभागाने शहरात शिबिरे घेवुन तपासणी केल्यानंतर अनेक कोरोनाबाधित रुग्ण समोर आले. यापुर्वी उपचारासाठी नगर जिल्हा रुग्णालयात जावे लागत होते. सध्या येथील संतलुक रुग्णालयात व्यवस्था उभारली असली तरी तेथील यंत्रणेवरील ताण सध्या वाढत आहे.
तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने काही अंशी दिलासा मिळला. तरी कोरोनामुळे आठ रुग्णांना जीव गमवावा लागला. शहरात सध्या कोरोना समुह संसर्गात असल्याने पुढील काळात रुग्ण संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. रुग्ण वाढल्यानंतर उपचार व्यवस्थेवरील ताणही वाढणार असल्याने कोरोनाची गंभीर स्थिती होऊ शकते. तरीही अनेक नागरीक शहरात आजही विनामास्कचे फिरताना दिसुन येतात. सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढल्याने सोशल डिस्टसिंगच्या नियांमाचे उल्लघंन होत आहे.
श्रीरामपूर कोरोना मिटर
- बरे झालेले रुग्ण : १०८
- एकुण बाधित रुग्ण : २०६
- अॅक्टीव रुग्ण : ६६
- कोरोनामुळे मृत्यु : सहा
- संशयीत मुत्यु : दोन
- तपासणी संख्या : ८४६
- निगेटिव्ह केसेस : ५३३
(स्त्रोत : स्थानिक प्रशासन)
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.