Politics sakal
अहिल्यानगर

नगरपालिका : नव्या प्रभाग रचनेने राजकीय गणिते बदलणार

श्रीरामपुरात रेल्वे लाईनच्या पलीकडे १८, तर अलीकडे १६ नगरसेवक

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना (ता. १०) प्रसिद्ध झाली. नगरसेवकांची संख्या ३२ वरून ३४ झाली आहे. नव्या रचनेनुसार अनेक प्रस्थापितांचे भाग सुरक्षित झाले, तर काहींना आगामी निवडणुकीत फटकाही बसू शकतो. नव्या रचनेमुळे पालिकेतील राजकीय गणिते बदलू शकतात.

रेल्वे लाईनच्या पलिकडील भागातून १८ नगरसेवक निवडून जाणार असल्याने या भागाकडे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या नजरा असतील, असा अंदाज राजकीय तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी आज (ता. १०) प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध केले. यावर १० ते १७ मार्चपर्यंत हरकती व सूचना मुख्याधिकाऱ्यांकडे नोंदवायचे आहेत. २२ मार्च रोजी जिल्हाधिकारी आलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेणार आहेत.

श्रीरामपूर शहराची लोकसंख्या ८९ हजार २८२ इतकी असून त्यात अनुसूचित जाती १६ हजार ६८८ व अनुसूचित जमाती १ हजार ९७३ इतकी लोकसंख्या आहे. प्रत्येक प्रभागासाठी सरासरी ५२५२ मतदार असतील. त्यात १० टक्के कमी अधिक होऊ शकतात. याआधारे एकूण १७ प्रभागातून पालिकेत ३४ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. १३ सर्वसाधारण महिला, सहा जागा अनुसूचित जाती (पैकी ३ महिला), एक अनुसूचित जमाती (महिला), १४ जागा सर्वसाधारण या पद्धतीने सदस्य निवडून द्यायचे आहेत. लोकसंख्येनुसार प्रभाग २, ३, ५, ६, ७ व ११ मधील प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती, तर प्रभाग १३ मधील एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव असेल.

प्रभाग प्रमुख पुढीलप्रमाणे : प्रभाग १ फातेमा हाउसिंग, झिरंगेवस्ती, गुरुनानक परिसर, प्रभाग २ गोंधवणी परिसर, प्रभाग ३ तहसील कचेरी परिसर, प्रभाग ४ मौलाना आझाद चौक परिसर, प्रभाग ५ बोरावके महाविद्यालय परिसर, प्रभाग ६ कांदा मार्केट परिसर, प्रभाग ७ राम मंदिर परिसर, प्रभाग ८ अखंडानंद आश्रम परिसर, प्रभाग ९ गुरुद्वारा, बागवान गल्ली, नेहरूनगर परिसर, प्रभाग १० बीफ मार्केट व गौसिया मस्जिद परिसर, प्रभाग ११ बजरंग चौक परिसर, प्रभाग १२ संजय नगर, इदगाह मैदान परिसर, प्रभाग १३ गजानन वसाहत, बाजारतळ, वडारवाडा झोपडपट्टी, गौंडगल्ली परिसर, प्रभाग १४ जनता हायस्कूल परिसर, प्रभाग १५ बोरावकेनगर,सुर्यानगर परिसर, प्रभाग १६ सरस्वती कॉलनी परिसर, प्रभाग १७ पूर्णवादनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT