On the sixth day there was no water in the industrial colony
On the sixth day there was no water in the industrial colony 
अहमदनगर

नगर जिल्ह्यातील या औद्योगिक वसाहतीत पाण्याची निर्जळी 

मार्तंड बुचुडे

पारनेर : सुपे औद्योगिक वसाहतीत नव्याने कोट्यवधींची गुंतवणूक करणाऱ्या जपानी कंपन्यांसह नवीन अनेक उद्योजक येऊ इच्छित आहेत. काही आलेही आहेत. असे असताना येथील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एमआयडीसीतील कारखानदारांना सहा दिवसांपासून पाणी मिळत नाही. पाणीपुरवठा बंद असल्याने अनेक उद्योग- व्यावसायिकांची तारांबळ झाली आहे. 

निंबळक (ता. नगर) शिवारात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, सहा दिवसांतही त्यांचे काम संपलेले नाही आणि अजूनही किमान दोन दिवस पाणी मिळणार नसल्याची माहिती मिळत आहे. सुपे येथील जुन्या एमआयडीसीत लहान-मोठे शंभरपेक्षा अधिक उद्योग- व्यवसाय आहेत. तसेच, म्हसणे फाटा येथील नवीन एमआयडीसीत मोठ्या चार ते पाच कंपन्या आहेत. यातील काहींच्या उभारणीचे काम सुरू आहे, तर काही कारखाने सुरू झाले आहेत. मात्र, या सर्वच उद्योगांना सहा दिवसांपासून पाणीच मिळत नाही. याआधी गेले दोन महिने लॉकडाउनमुळे उद्योग बंद होते. आता काही उद्योग जेमतेम सुरू झाले आहेत. त्यात सहा दिवसांपासून त्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे येथील उद्योग- व्यवस्थापनासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, काम सुरू असल्याचे सांगून ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. 

पाणी नसल्यामुळे येथील कारखानदार अडचणीत आहेत. केवळ पाण्याअभावी येथील अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. अनेकांनी कारखाने बंद ठेवल्यामुळे कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच, काही उद्योजकांवर टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. 
एमआयडीसीमधील अधिकारी निष्काळजीपणे काम करीत आहेत. उद्योग- व्यवसायांना सहा दिवस पाणी मिळत नसेल, तर येथे नव्याने उद्योग कसे येतील? येथे नव्याने औद्योगिक वसाहत होत आहे. या स्थितीत अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा योग्य नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीच्या विकासावर परिणाम होईल. संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करून औद्योगिक वसाहत वाढविण्यासाठी हातभार लावावा, असे मत स्थानिक व्यक्‍त करीत आहेत. 

निंबळक शिवारात जलवाहिनी फुटल्यामुळे येथील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. आम्ही 50 कामगार व यंत्रसामग्रीसह काम करीत आहोत. येथे पाऊस झाल्याने दुरुस्तीच्या कामात अडथळा येत आहे. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल 
- एन. जी. राठोड, अभियंता, पाणी, विद्युत व यांत्रिकी विभाग  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT