Balasaheb Thorat
Balasaheb Thorat esakal
अहमदनगर

अहमदनगर : सोनिया गांधी ठरवतील उमेदवार

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

संगमनेर : लोकसभेप्रमाणे अध्यक्षनिवडीची पद्धत आम्ही स्वीकारली आहे. यात गुप्त पद्धतीने मतदान होत नाही. विधानसभेतही(vidhansabha) तशीच प्रक्रिया असते. सोमवारी ही निवडणूक जाहीर करून मंगळवारी प्रक्रिया पूर्ण होईल. अध्यक्षपदाचा उमेदवार सोनिया गांधी(sonia gandhi) ठरवतील. तो आम्हा सर्वांना मान्य असेल, असे विधान महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(balasaheb thorat) यांनी केले. संगमनेर नगरपरिषदेच्या(sangamner nagarparishad) 200 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या उद्‌घाटन व लोकार्पण सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात गाजलेल्या पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसचा(congress) कोणीही दोषी आढळणार नाही किंवा कोणी मंत्री अडकण्याचा विषय नसल्याची ठाम ग्वाही थोरात यांनी दिली. या प्रकरणातील दोषींना शिक्षा झालेली दिसेल. या प्रकरणाच्या तपासासाठी आमची यंत्रणा सक्षम असल्याने, दुसऱ्याला निमंत्रण देण्याची आवश्यकता नाही. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या विरोधकांच्या मागणीवर थोरात यांनी हे स्पष्ट केले.

केंद्राने डिझेलचे दर कमी केले. राज्य मात्र करीत नसल्याने, त्यावेळी सायकलवरून मोर्चे काढणारे आता गप्प का बसले आहेत, याची विचारणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याबाबत विचारले असता थोरात म्हणाले, की केंद्र सरकारने कच्च्या तेलाचे दर अत्यंत कमी असतानाही डिझेलचे दर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशातून खूप पैसा काढून घेतला. उलट, राज्याचे 31 हजार कोटी रुपये जीएसटी परतावा केंद्राकडून येणे बाकी आहे. आर्थिक अडचणींमुळे कर्मचारी पगार, विकासकामांसाठी राज्याला कर्ज काढावे लागत आहे. केंद्राकडून पैसे मिळण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले तर जास्त चांगले होईल, असा टोला फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT