Student assaulted in class Incident at Prathityash College ahmednagar crime update
Student assaulted in class Incident at Prathityash College ahmednagar crime update Sakal
अहमदनगर

Ahmednagar News : विद्यार्थिनीला वर्गात डांबून मारहाण; प्रथितयश महाविद्यालयातील घटना

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शहरातील एका प्रथितयश महाविद्यालयात विद्यार्थिनीला वर्गात डांबून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. १९) दुपारी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सहा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, असे काही घडले नसून, संबंधित मुलीनेच हा बनाव केला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मारहाण करण्यात आलेली मुलगी प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. ती मंगळवारी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आली होती. दुपारी चारच्या सुमारास तासिकांची वेळ संपल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच प्राध्यापक असे सारेच वर्गातून बाहेर आले. दरम्यान, याच वेळी तोंडाला मास्क आणि रुमाल बांधलेले पाच-सहा तरुण त्या इमारतीमध्ये घुसले.

ते इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर गेल्याचे कोणाच्याच लक्षात आले नाही. या तरुणांनी संबंधित मुलीला एकटीला गाठले. मारहाण करून तिचे हातपाय बांधले. मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर तरुणांनी तिच्या अंगावर बेंचेसे टाकले. त्यानंतर हे तरुण निघून गेले.

हात-पाय बांधलेल्या अवस्थेत बेंचखाली असलेल्या मुलीच्या मोबाईलवर तिच्या घरुन फोन आला. त्यावेळी तिने कसाबसा मोबाईलवरून घरच्यांशी संपर्क करत झाला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी सायंकाळी सातच्या सुमारास तिची सुटका केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेत त्यांनी ज्या इमारतीच्या मजल्यावर हा प्रकार घडला, तेथील पाहणी केली.

खरा प्रकार समोर येईल

महाविद्यालयात विद्यार्थिनीला वर्गात डांबून मारहाण करण्यात आली. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेमुळे पालक आणि विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, झाल्या प्रकाराबाबत संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क केला असता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पोलिस तपास सुरू आहे. तपासानंतर खरा प्रकार समोर येईल. आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच आमचे पथक तातडीने घटनास्थळी गेले. महाविद्यालयासह परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासले आहे. असा कोणताच प्रकार घडलेला नाही. या मुलीने बनाव केला असल्याचे तपासातून समोर येत आहे.

- आनंद कोकरे, पोलिस निरीक्षक, तोफखाना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT