ustodani. 
अहिल्यानगर

विविध मागण्यासाठी ऊसतोड कामगारांचे डोळे सरकार आणि संघटनांच्या निर्णयाकडे

सचिन सातपुते

शेवगाव (नगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडावर आलेल्या ऊसतोडणी हंगामासाठी जाण्याबाबत ऊसतोड कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच  वेगवेगळ्या ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी सरकार व कारखानदार यांच्याकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यामुळे शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड कामगारांचे डोळे सरकार आणि संघटनांच्या निर्णयाकडे लागले आहेत. 

शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पुर्व भागातील ८० हजार ते एक लाख ऊसतोड कामगार राज्यात विविध कारखान्यांना दरवर्षी तोडणीसाठी जातात. जिल्हयासह सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या भागातील साखर कारखान्यांना ऊसतोड मजूर पुरवणारे तालुके म्हणून या दोन तालुक्यांकडे पाहिले जाते. यावर्षी समाधानकारक पावसामुळे ऊसाचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे हंगाम दीर्घ काळ चालणार आहेत. मात्र सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड मजूर व त्यांच्या कुटूंबियांना विविध आरोग्य सुविधा पुरवाव्यात, यासाठी ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी सरकार व साखर कारखानदार यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.

मजूरी वाढ करण्याबरोबरच मोफत आरोग्य सेवा, कारखान्यावर कोवीड सेंटर तयार करणे, पद्मश्री डॉ.  विठ्ठलराव विखे ऊसतोड कामगार सुरक्षा विमा योजनेची अंमलबाजवणी करुन त्याची विमा रक्कम पाच लाख करण्यात यावी. कामगारांच्या मुलांसाठी निमासी आश्रम शाळा सुरु कराव्यात, नगर जिल्हयात राबवण्यात आलेला ऊसतोड कामगार उनत्ती प्रकल्प राज्यभर राबवण्यात यावा, कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, मजूरांच्या अडयावर स्वच्छ पाणी व लाईटची व्यवस्था करण्यात यावी. मुकाद्दम व कामगार यांना शासकीय ओळखपत्र देण्यात यावे.

ऊसतोड कामगारांच्या मुलांना नोकरीमध्ये स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे आणि मागील हंगामाचे ऊसतोडणी फरक बील त्वरीत मिळावे. यामागण्या महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकाद्दम कामगार युनियन यांच्यामार्फत सरकारकडे करण्यात आलेल्या आहेत. या संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी या मागण्या मान्य न झाल्यास ऊसतोड कामगार व वाहतूक मुकाद्दम बेमुदत संपावर जातील. 

मागील वर्षीचा हंगाम मार्च एप्रिलपर्यंत लांबल्यानंतर कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने लागू केलेल्या लाँकडाऊनमुळे तालुक्यातील अनेक कामगार पश्चिम महाराष्ट्रातील कारखाना कार्यस्थळावर अडकून पडले होते. त्यामध्ये कामगारांचे व त्यांच्या कुटूंबियांची मोठी हेळसांड झाली होती. त्यामुळे अनेक कामगारांनी यावर्षी कारखान्याची उचल घेतलेली नाही. त्यातच कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस ग्रामीण भागातही वाढत असल्याने याबाबत काय उपाय योजना करणार असे कारखान्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे या हंगामातील ऊसतोडणीसाठी कारखान्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतुक मुकाद्दम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे म्हणाले, ऊसतोड कामगार कुटूंबातील ६० वर्षावरील वृध्द व लहान मुलांना ऊसतोडणीसाठी आणू नये, अशी अट सरकारने घातली आहे. त्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी या काळात कोण घेणार असा प्रश्न आहे. या शिवाय विविध बारा मागण्यांसाठी सरकार व साखर कारखानदार यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. त्या मान्य न झाल्यास संघटनेकडून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT