agitation esakal
अहिल्यानगर

राज्यात तामिळनाडूच्या धर्तीवर आंदोलन छेडणार! - बैलगाडा मालक

सकाळ डिजिटल टीम

निघोज (जि.अहमदनगर) : राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी राज्य शासनाला येत्या पंधरा दिवसांची मुदत दिली असून राज्यकर्त्यांनी जर याकडे डोळेझाक केली तर येत्या पंधरा दिवसांनी राज्यात तामिळनाडूच्या (tamilnadu) धर्तीवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बैलगाडा मालकांनी दिला आहे. महाराष्ट्राची बैलगाडासंस्कृती जपण्यासाठी आम्ही 'करो या मरो 'आंदोलन हाती घेतले आहे, असा इशारा बैलगाडा मालकांनी दिला आहे.

'करो या मरो 'आंदोलन

बैलगाडा शर्यतीवर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. याबाबत बैलगाडा मालकांनी अनेकदा राज्य शासनाचे लक्ष वेधले. मात्र बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी राज्य शासनातर्फे कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. उलट राज्यकर्ते झोपेचे सोंग घेते. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी व बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी बैलगाडा मालकांनी आता कंबर कसली आहे. यासाठी निघोज येथे पारनेर, शिरूर, मावळ, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील बैलगाडा मालकांची बैठक आज पार पडली. या बैठकीत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा व्हावा अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेतर्फे देण्यात आला.

पाठपुरावा करण्यात राज्य शासन अपयशी

तामिळनाडूमध्ये शर्यतीवरील बंदी उठवली मग महाराष्ट्रातच का बंदी उठवली जात नाही. याचा न्यायालयीन पाठपुरावा करण्यात राज्य शासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते मंडळींनीची साथ घेऊन येत्या पंधरा दिवसांनी राज्यात मोठे आदोलन हाती घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यासाठी बैलगाडा मालकांनी हे शेवटचे व निर्णायक आंदोलन हाती घेऊन जो पर्यंत बैलगाडा शर्यत चालू होणार नाही, तोपर्यंत लढा चालू ठेवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबत प्रशासनालाही निवेदन देण्यात येणार आहेत.

राज्य पातळीवर छेडण्यात येणाऱ्या या आंदोलनात बैलगाडा मालकांनी तन मन व धनानी सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या बैठकीला रोहन महाराज मोरे, तुषार डावरे, विकास चव्हाण, अमोल गायकवाड, विशाल लोंढे, सरपंच सुहास भालेकर, देविदास कदम, नीलेश काळे, अर्जुन लामखडे, गोरख बोदगे, अविनाश लाळगे, रुपेश वरखडे, गोरख पठारे, संतोष शिनारे, दत्ता चाटे, गणेश ढवण, तुषार लामखडे, गुंडा भोसले, अक्षय लामखडे, नारायण रसाळ आदी बैलगाडा मालक उपस्थित होते.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी हाती घेतलेल्या या राज्यस्तरीय आंदोलनात पारनेर तालुक्यातून दहा हजार जण सहभागी होतील. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बैलगाडा शर्यत जो पर्यंत चालू होत नाही, तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवणार आहे. - अर्जुन लामखडे, बैलगाडा मालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

आरोग्य‘चेतना’ : स्पायनल ट्युमरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

SCROLL FOR NEXT