अहिल्यानगर

‘थोरात’ विरोधात ठाकले प्रवराकाठचे शेतकरी

दूषित पाण्याबाबत ११ गावे आली एकत्र; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : प्रवरा नदीपात्रात थोरात कारखाना, नगरपालिकेकडून सोडण्‍यात येत असलेल्‍या दूषित पाण्‍यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे दूषित पाणी सोडण्यास संबंधितांना मज्जाव करावा, अशी मागणी तालुक्यातील नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदनाद्वारे केली. तसेच अकरा गावांनी ग्रामसभेते केलेले ठराव देऊन कारखाना व नगरपालिकेविरोधात रणशिंग फुंकले आहे.

अंकुशराव कांगणे, सरपंच रखमाजी खेमनर, भाजपचे दादासाहेब गुंजाळ, सचिन शिंदे, रवींद्र गाढे, अर्जुन हाळनोर, सचिन खेमनर आदींसह विविध गावांच्‍या ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्‍थांनी जिल्‍हाधिकारी व महाराष्‍ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या आधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, मागील अनेक वर्षांपासून थोरात सहकारी साखर कारखान्याचे रसायनयुक्त पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्याबाबत वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. संगमनेर नगरपालिकेचे शहरातील सांडपाणी तसेच हॉटेल व्यावसायिक, रुग्णालयांचा जैविक कचरा व मैला वाहून नेणारे टँकरही प्रवरा नदीपात्रातच आणून सोडल्याच्याही घटना घडल्या आहेत.

शहरातील अवैध कत्तलखान्यातील मांसाचे तुकडे व रक्तमिश्रित सांडपाणीही नदीपात्रात सोडले जाते. या विरोधात वेळोवेळी आंदोलने करूनही पालिकेने एसटीपी प्‍लॅन्‍ट उभारलेला नाही. त्‍यामुळे हे सर्व दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी नदीपात्रात सोडल्याने परिसरातील गावांचा पिण्याचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.नदीकाठच्‍या अकरा गावांच्या ग्रामपंचायतींनी केलेल्या ठरावाच्या प्रती घेऊन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT