A traditional game is being played in Ralegan
A traditional game is being played in Ralegan 
अहमदनगर

राळेगणसिद्धीत चालतो कौरव-पांडवांच्या द्युताचा खेळ

एकनाथ भालेकर

राळेगण सिद्धी : कोरोना संसर्गजन्य रोगाचे संकट असताना सामाजिक अंतर ठेवून राळेगणसिद्धी येथे परंपरागत चालत आलेला सोंगट्यांचा खेळ देवीसमोर खेळून भाविक भक्त देवीचा जागर केला. येथील पद्मावती मातेच्या नवरात्र महोत्सवानिमित्त येथील गावातील ग्रामदैवताच्या मंदिरात पारंपरिक पध्दतीने सोंगट्याचा खेळ खेळला जात आहे.

कौरव-पांडवांचा खेळ म्हणूनही या खेळास ओळखले जाते. नवरात्र उत्सवाच्या कालावधीतच हा खेळ खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण एकत्र येत असून गेल्या अनेक वर्षांची असलेली परंपरा यानिमित्ताने आजही गावकऱ्यांकडून जपली जात आहे.

या खेळासाठी कापडी सारीपाट वापरला जातो. लाकडी सोंगट्यांचा वापर होतो. लाकडी सोंगट्या कापडी पटावर ठेऊन हा खेळ सुरु होतो. तर फासे म्हणून कवड्यांचा वापर केला जातो. ज्या प्रमाणे खेळाडू कवड्याचे दान घेतो त्या दानानुसार सोंगटी पटावर पुढे चालवली जाते.

हा खेळ दोन गटांत खेळवला जात असल्याने ज्या गटाच्या सोंगट्या सारीपाटाच्या मध्यभागी सर्वात प्रथम जातील तो गट विजयी होतो. या खेळात एक डाव पूर्ण होण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याने खेळात अधिक रंजकता निर्माण होत असते.

उत्सव म्हणून अनेक वर्षापासून नवरात्र उत्सवात जागर व्हावा म्हणून करमणुकीसाठी हा खेळ खेळला जातो. पूर्वी या खेळात मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा सहभाग असायचा. मात्र, मैदानी खेळांप्रमाणेच तरुण वर्गाने या खेळाकडेही पाठ फिरवली आहे.

पूर्वी या खेळात मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा सहभाग असायचा. मात्र, मैदानी खेळांप्रमाणेच तरुण वर्गाने या खेळाकडे पाठ फिरवली आहे. आपले पारंपरिक खेळ लोप पावत आहे. आजच्या तरुण पिढीने आधुनिक खेळाबरोबरच या खेळांकडे सुद्धा वळले पाहिजे. आपली परंपरा जपण्यासाठी तरुणांनी हा खेळ समजून घेऊन खेळला पाहिजे अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक कांतिलाल औटी यावेळी सकाळशी बोलताना व्यक्त केली.

एकनाथ पठारे, कांतीलाल औटी, अर्जुन औटी, सुभाष पठारे, गणेश हजारे, विजय हजारे, ज्ञानदेव कांबळे, विकास कांबळे, करण पठारे, सुनील पठारे, प्रविण पठारे, शुभम पठारे, ओंकार कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित असतात.

महाभारतातील खेळ
महाभारतात हा खेळ खेळल्याचे सर्वश्रुत आहे. याच खेळात कौरवांसोबत पांडव हरल्याने पांडवांना 12 वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात काढावे लागले होते. 

आजकालच्या स्मार्ट मोबाइलमध्ये आढळणारा ल्युडो गेम हा या सारीपाटाचाच आधुनिक अवतार म्हणावा लागेल, इतका सारखेपणा त्यात दिसतो. मात्र, हा खेळ जरी सारखा असला तरी समोरासमोर बसून गप्पागोष्टी करत तसेच एकमेकांशी संवाद साधत खेळ खेळण्यात व दुसऱ्यावर मात करण्यात जी मजा आहे, ती मोबाइलमधील गेममध्ये निश्चितच नाही.

- सुभाष पठारे, ग्रामस्थ

 

वर्षातून एकदाच आम्ही हा खेळ खेळत असल्याने या खेळाची आवड असलेले गावातील नागरिक मंदिरात दररोज हजेरी लावतात. सध्या जरी कोरोनाचे संकट असले तरी आम्ही सुरक्षित अंतर ठेवून तसेच सर्व काळजी घेऊन सोंगट्या खेळत देवीचा जागर करतो.
- विजय हजारे - ग्रामस्थ 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT