Tulja Bhavani's palanquin started from Rahuri
Tulja Bhavani's palanquin started from Rahuri 
अहमदनगर

माहेराहून निघाली तुळजा भवानीचा पालखी

विलास कुलकर्णी

राहुरी : राहुरीची माहेरवाशीण व महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानीमातेच्या पालखीची खांद्यावरून मिरवणुकीची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित झाली.

अत्यंत साध्या पद्धतीने काल (शनिवारी) तुळजापूरच्या दिशेने पालखी बुऱ्हाणनगरकडे (नगर) रवाना करण्यात आली. 
बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे व सुजाता तनपुरे यांच्या हस्ते पालखीपूजन होऊन आरती करण्यात आली.

या वेळी हर्ष तनपुरे, ताराचंद तनपुरे, राजेंद्र वाडेकर, नंदकुमार तनपुरे, अण्णासाहेब शेटे, अरुण ठोकळे, संतोष आघाव, सुरेश धोत्रे, ऍड. राहुल शेटे, संजय पन्हाळे, दीपक साळवे, अमोल जंगम, सचिन ढवळे, सुनील दायमा, पांडू उदावंत यांच्यासह भाविक या वेळी उपस्थित होते.

तुळजापूरमधील नवरात्रोत्सवासाठी भवानीमातेची पालखी तयार करण्याची परंपरा येथे आहे. पालखीचा दांडा बुऱ्हाणनगर येथून येतो. पालखी तयार करण्याचा मान तेली, सुतार, माळी, लोहार समाजांना आहे. मुस्लिम समाजाचेही यात योगदान असते.

पालखी तयार झाल्यानंतर पानाचा विडा देण्याचा मान गोरख तांबोळी कुटुंबाला, तर आरतीचा मान अण्णासाहेब शेटे यांच्या कुटुंबाला आहे. शहरातून पालखीची मिरवणूक काढली जाते. प्रत्येक मानकरी पालखी घरासमोर आल्यावर साडी-चोळी, श्रीफळाने ओटी भरतात. या वर्षी मात्र कोरोनामुळे मिरवणुकीची परंपरा खंडित झाली. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

SCROLL FOR NEXT