Tur Grains Sakal
अहिल्यानगर

Tur Grains : तूर क्षेत्रात दुपटीने वाढ; बाजरीत घट

अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीन पिकाची सरासरी क्षेत्र ८७ हजार ३३० हेक्टर असून प्रत्यक्षात मात्र वाढ होवून १ लाख ५१ हजार १९७ इतक्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. खरीप हंगामात सुरुवातीलाच मूग, बाजरी, सोयाबीन, तूर, उडीद, कपासीसह चारा पिकांची पेरणी झाली. जिल्ह्यात ६५ हजार ९४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. तुरीचे क्षेत्र दुपटीने वाढले तर बाजरीच्या क्षेत्रात घट झाली.

जिल्ह्यात सोयाबीन पिकाची सरासरी क्षेत्र ८७ हजार ३३० हेक्टर असून प्रत्यक्षात मात्र वाढ होवून १ लाख ५१ हजार १९७ इतक्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तुरीची ३६ हजार १०४ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, यात दुपटीने वाढ झाली. ६५ हजार ९४६ हेक्टरवर इतकी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात कडधान्य पिकांची ८६ टक्के पेरणी झाली आहे. मात्र, बाजरी पिकाची घट झालेली आहे.

जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ५ लाख ७९ हजार हेक्टर आहे. दरवर्षी पडणारा पाऊस आणि हवामान खात्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे कृषी विभाग खरीप हंगामाच्या पेरण्या प्रस्तावित करतात. त्यानुसार यावर्षी ६ लाख ४२ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. मात्र, पाऊस चांगला झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे क्षेत्र सरासरीपेक्षा जास्त वाढले आहे.

जिल्ह्यात विशेषतः दक्षिण भागात नगर, पारनेर, कर्जत, जामखेड आणि जिल्ह्यातील उत्तर भागातील पठार भागात कडधान्य पिकांखालील क्षेत्र जास्त असते. तूर, मूग, उडीद, मठ या कडधान्य पिकांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या उर्वरित भागात बाजरी, सोयाबीन, कापूस, चारा पिकांसह ऊस लागवड करण्यात येते. मात्र, गेल्या दोन- तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली.

सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ

जिल्ह्यात सोयाबीन पिकाची सरासरी क्षेत्र ८७ हजार ३३० हेक्टर असून मात्र प्रत्यक्षात १ लाख ५१ हजार १९७ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उडिदाची ४० हजार ४०५ हेक्टर सरासरी क्षेत्र असून ५७ हजार ७०२ क्षेत्रावर पेरणी झाली. मूग ४८ हजार २०५ हेक्टर, तूर ३६ हजार १०४ हेक्टरवर सरासरी क्षेत्र आहे. बाजरी पिकाची ६५ हजार ९९ हेक्टरवर तर १ लाख ३५ हजार ९४० हेक्टरवर कपाशीची सर्वाधिक लागवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT