Turmeric sakal
अहिल्यानगर

हिंगोली बाजार समितीत हळदीची आवक वाढली

सहा ते आठ हजार रुपये क्विंटलला दर

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली: हिंगोली बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळद मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आली आहे. हिंगोली जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील तसेच विदर्भातूनही हळद येत आहे. सध्या हळदीला सहा ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

हिंगोली येथील हळदीचे मार्केट सर्वदूर प्रसिद्ध आहे. येथील बाजार समितीमध्ये जिल्हाभरासह विदर्भातील हळद उत्पादक मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी घेऊन येतात. येथील बाजार समिती मध्ये हळदीला चांगला दर मिळत असल्याने हळद उत्पादक हळद विक्रीसाठी आणतात. दरम्यान, होळी व धुलीवंदनामुळे बाजार समिती बंद असल्याने दोन दिवसापासून बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची आवक वाढली आहे. यात जिल्ह्यासह विदर्भातील हळद विक्रेते वाहनातून हळद विक्रीसाठी घेऊन आले आहेत.

मागच्या काही दिवसापासून हळदीचे दर स्थिर असून आवक मात्र वाढली आहे. मार्केटमध्ये शेकडो वाहनातून सहा ते सात हजार हळदीच्या पोत्याची आवक झाली आहे. हळदीला सहा ते आठ हजार रुपये दर मिळाला आहे. सुट्ट्यानंतर हळदीचे दर वाढतील अशी हळद उत्पादकांना आशा होती, मात्र आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने आणि दर स्थिर असल्यामुळे काही शेतकऱ्यानी नाराजी व्यक्त केली.

होळी, धूलिवंदनामुळे बाजार समिती बंद होती. ती सुरू झाल्याने हळद विक्रीसाठी आणली होती. भाव वाढतील अशी अपेक्षा होती. मात्र आवक वाढल्याने भाव स्थिर होते.

एकनाथ नागरे. हळद उत्पादक शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT