Two groups clashed on Monday morning over a farm embankment at Guha 
अहिल्यानगर

शेताच्या बांधावरून दोन गटांत हाणामारी ; परस्परविरोधी फिर्यादी, सोळा जणांवर गुन्हे

विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : गुहा येथे शेताच्या बांधावरून सोमवारी (ता. 4) सकाळी दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यात कुऱ्हाडीसह लाकडी दांडके, लोखंडी पाइपचा वापर झाला. परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटांच्या 16 जणांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, सर्व आरोपी पसार झाले आहेत.
 
गुहा येथील जुना सात्रळ रस्त्यावरील ओहोळ-भालेराव कुटुंबांत धुमश्‍चक्री झाली. भालेराव कुटुंबाने कुऱ्हाड व कुदळीच्या दांड्याने मारहाण केल्याचा आरोप ओहोळ कुटुंबाने केला. तर, बांधाच्या वादातून ओहोळ कुटुंबाने लोखंडी पाइप, कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याचा आरोप भालेराव कुटुंबाने केला. 

सिद्धार्थ राजेंद्र ओहळ (वय 30) यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब दगडू भालेराव, सतीश दगडू भालेराव, दगडू लक्ष्मण भालेराव, सुरेश भागवत ओहोळ, राहुल सुरेश भालेराव, रवींद्र दगडू भालेराव, अशोक सुरेश भालेराव (सर्व रा. गुहा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बाळासाहेब दगडू भालेराव (वय 35) यांच्या फिर्यादीवरून अशोक गणपत ओहोळ, नंदा अशोक ओहोळ, राजेंद्र गणपत ओहोळ, सुनिता रमेश ओहोळ, सुनिता राजेंद्र ओहोळ, निखील राजेंद्र ओहोळ, अक्षय राजेंद्र ओहोळ, प्रवीण अशोक ओहोळ, विकास रमेश ओहोळ (सर्व रा. गुहा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

AI Superintelligence Race: AI माणसांना संपवू शकतो; Anthropic च्या संशोधकाने राजीनामा देत दिला गंभीर इशारा!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT