The Ujjwala scheme stopped the supply of kerosene to the poor 
अहिल्यानगर

उज्ज्वलाने रॉकेल हिरावले, महागाईने गॅस; गरिबांनी पोट जाळायचं कसं?

शांताराम काळे

अकोले : केंद्र सरकारने जाहिरातबाजी करीत महिलांना उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस सिलिंडर दिले. दुसरीकडे रॉकेल बंद केले. आता गॅस सिलिंडरचे वाढते दर पाहता, उज्ज्वला योजनेने रॉकेल नेले, तर महागाईने गॅस सिलिंडर हिरावला, असे म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील महिलांवर आली आहे. 

केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत, ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील महिलांना मोफत गॅसजोड दिले. सध्या गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्याने त्यांना रिफिलिंग परवडेनासे झाले आहे. मोलमजुरी करून या महिला आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत आहेत. त्यामुळे नवीन गॅस सिलिंडर घेण्यासाठी पैसे कोठून आणावेत, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. 

गॅस सिलिंडर मिळाल्याने रॉकेलही बंद झाले आहे. त्यामुळे उज्ज्वला गॅस योजनेने रॉकेल हिरावले, तर महागाईने गॅस हिरावला, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. गॅस व रॉकेलअभावी अनेक घरांत चुली पेटू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी महिलांकडून होत आहे. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: "स्वतःच्या खात्याची माहिती नाही, उत्तर द्यायलाही भीती!" आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सभागृहावर बहिष्कार

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यातील शिंदेच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... संजू सॅमसन IN; आयर्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI

‘कोई मिल गया’ वीण दोघांतली…’मधील कलाकारांचा जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर Viral Video

India Squad Change: भारतीय संघात मुंबईकर खेळाडूची एन्ट्री! श्रेयस अय्यरचा भिडू खेळाडू हार्दिक, नितीश कुमारची उणीव भरून काढणार

SCROLL FOR NEXT