India Squad Change: भारतीय संघात मुंबईकर खेळाडूची एन्ट्री! श्रेयस अय्यरचा भिडू खेळाडू हार्दिक, नितीश कुमारची उणीव भरून काढणार

Team India Squad Changes Updates: भारतीय संघ सध्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. पण या दौऱ्यातील सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वीच भारताच्या टी२० आणि वनडे संघात बदल करावा लागला आहे. मुंबईच्या अष्टपैलू खेळाडूला संघात संधी मिळाली आहे.
Suryansh Shedge Replaces Injured Nitish Reddy In India Squad

Suryansh Shedge Replaces Injured Nitish Reddy In India Squad

Sakal

Updated on

Team India Squad Changes Updates: भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर या आठवड्यात दोन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेपासून श्रेयस अय्यर भारताच्या टी२० संघाच्या नेतृत्वाचा कार्यकाळ सुरू करेल. मात्र असे असतानाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

फिरकीपटू वरुण चक्रवर्तीसह युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी देखील या टी२० मालिकेतून बाहेर झाला आहे. तसेच तो इंग्लंड दौऱ्यालाही मुकण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौऱ्यात भारताला १ ते ११ जुलैदरम्यान टी२० मालिका आणि नंतर १४ जुलैपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.

या दोन्ही मालिकांना दुखापतीमुळे हार्दिक पांड्याही मुकला असताना नितीश त्याची जागा भरून काढेल, असे अपेक्षित होते. मात्र त्याला मांडीची दुखापत झाली. त्यामुळे तो या दोन्ही दौऱ्यांमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.

Suryansh Shedge Replaces Injured Nitish Reddy In India Squad
IND vs IRE T20I: टीम इंडियाशी भिडण्यासाठी नव्या कर्णधारासह आयर्लंड सज्ज! संघाची घोषणा, ३ नव्या खेळाडूंना संधी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com