लसीकरण
लसीकरण Esakal
अहमदनगर

लसीकरणात घुसखोरी, शहरीबाबूंच्याच गावातल्या केंद्रांवर रांगा

राजेंद्र सावंत

पाथर्डी ः दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पाथर्डीवर कलंकाचा डाग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा डाग पुसत नाही तोच बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांनी आता लसीकरणाला येऊन पाथर्डीकरांना लसीकरणासाठी वंचित ठेऊन आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे. यामुळे पाथर्डीकर लसीकरणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बाहेरील जिल्ह्यातील घुसखोरी थांबविण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (Vaccination of urban people at health centers in rural areas)

पाथर्डीत प्राथमिक आरोग्य केंद्रासोबतच आता उपकेंद्रावरही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेला जसे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पाथर्डीत प्रवेश घेऊन परीक्षेसाठी बसविले जात होते. तशीच पध्दत आता कोरोना लसीकरणाबाबत राबविली जात आहे.

लसीकरणासाठी आता ऑनलाईन नोंदणी असल्याने नाशिक, नगर, पुणे, बीड येथील नागरिक पाथर्डीत लसीकरणासाठी दाखल होत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी सरकार आग्रही असून नागरिकही लस घेण्यासाठी घाई करीत आहे. शहरात आतापर्यंत पाच हजार 412 जणांनी कोरोनाचे लसीकरण केले असून 1436 जणांनी दुसरा डोसही दिला आहे.

कोरोनावर लसीकरण हाच कोरोनाला रोखण्यासाठी रामबाण उपाय आहे, याचे महत्व आता सर्वसामान्यांना समजल्याने ते लसीकरणासाठी गर्दी करू लागलेले आहेत. खाजगी दवाखान्यात लस उपलब्ध नसल्याने अनेकजण जिल्ह्याबाहेर जात आहेत. काहीजण परजिल्ह्यातून पाथर्डीत लस घेऊन परत माघारी जात आहेत. लसीकरणाच्या नावाखाली आता जिल्हाबंदी असताना प्रवासाला परवानगी कशी दिले जाते हा प्रश्न आहे.

कोरोनाच्या लसीकरणासाठी लोकांनी मोबाईलवर रजिस्टेशन करुन त्यांचा ज्या दिवशी नंबर असेल त्याच वेळी यावे. विनाकारण गर्दी करु नये. शहराबरोबरच ग्रामीण भागातही आता लसीकरणाचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

- डॉ. भगवान दराडे, तालुका आरोग्य अधिकारी, पाथर्डी.

कोरोनाची लस प्रत्येकाला मिळावी अशी अपेक्षा सर्वांची आहे. नागरिक कोरोनाला घाबरुन लसीकरणासाठी गर्दी करीत आहेत. सरकारी रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रसोबतच आता खाजगी दवाखान्यातही लस मिळावी. मोबाईलवर रजिस्टेशन करण्याबाबत अनेक अडचणी आहेत. ग्रामीण भागातील लोकांना याचा फटका बसत आहे

- दादापाटील कंठाळी, सरपंच सुसरे, ता. पाथर्डी.

ग्रामीण भागातील लसीकरणाची आकडेवारी

तिसगाव ः2728, मिरी ः 2726, खरवंडी ः 2087, पागोरी ः पिंपळगाव ः 1477, माणिकदौंडी ः 1277, पिपंळगाव टप्पा ः 939 असे एकूण 11 हजार 234.

(Vaccination of urban people at health centers in rural areas)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितच्या 'त्या' गंभीर आरोपावर स्टार स्पोर्ट्सचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'क्लिपमध्ये फक्त...'

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT