The villagers have decided to remove the old castle stones for the water bank and give them for pitching.jpg 
अहिल्यानगर

'वॉटर बॅंके'साठी जुन्या वाड्यांचे दगड काढून पिचिंगसाठी देण्याचा निर्णय

वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : तालुक्‍यातील सरदवाडीत साकारलेल्या 'वॉटर बॅंके'च्या बळकटीसाठी गावातील, वापरात नसलेल्या पुरातन वाड्याचे दगड काढून पिचिंगसाठी देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. हा निर्णय कौतुकास्पद असून, सरदवाडीकरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार आस्थापना 'सील'
 
सरदवाडी (ता. जामखेड) येथे सुरू असलेल्या 'वॉटर बॅंके'च्या कामाची आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. सरदवाडी हे अवघे एक हजार लोकसंख्येचे गाव असून, भूगर्भातील पाणीसाठा कमी झाल्याने गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. दर वर्षी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. उन्हाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे पाण्यासाठी जमेल तसे जो-तो इतरत्र स्थलांतरित झाला. त्यामुळे या गावात पुरातन अनेक घरे व चिरेबंदी वाडे माणसांविना उभे आहेत. या वाड्यांचे दगड या 'वॉटर बॅंके'च्या पिचिंगसाठी देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. येथील पाणीपुरवठा विहीर व जुन्या आडाजवळील दोन नाल्यांचे खोलीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला. ग्रामस्थांनीही तयारी दाखविली. त्यातून हे काम पूर्णत्वास गेले.
 
सकाळ रिलीफ फंड, कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्था व नाम फाउंडेशन यांच्या मदतीने येथील दोन्ही नालाबांधांचे खोलीकरण, रुंदीकरण व सांडवा नूतनीकरणाचे काम झाले. त्यात साडेसात ते आठ कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता तयार झाली. या 'वॉटर बॅंके'ला बळकटी मिळावी, यासाठी माजी सरपंच रामदास सिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. या 'वॉटर बॅंके'मुळे परिसरातील सर्वांचाच पाणीप्रश्न सुटेल, हे मात्र निश्‍चित. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT