Water is being stolen and sold from Ghod Dam at Shrigonde.jpg
Water is being stolen and sold from Ghod Dam at Shrigonde.jpg 
अहमदनगर

घोड धरणातील पाण्यावर कर्मचाऱ्यांचाच डल्ला; धरणातील पाण्याची चोरुन विक्री

संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) :  घोड धरणातून पाण्याची चोरुन विक्री सुरु असून त्यासाठी काही कर्मचाऱ्यांनीच धरणाच्या दरवाजातून गळती सुरु केल्याचा भयानक प्रकार सुरु आहे. दोन दिवसांपासून धरणातील पाणी सुरु असून, बोभाटा होवू नये यासाठी सुरुवातीला कालव्यात व नंतर नदीला पाणी सोडण्यात आले. दरम्यान याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यावर आता संबधितांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

घोड धरणातून उजवा कालवा शिरुर जि. पुणे व डावा कालव्यातून श्रीगोंदे व कर्जत जि. नगर येथील क्षेत्र ओलीताखाली येते. ५५ वर्षांपुर्वीचे हे धरण या दोन जिल्ह्यातील तीन तालुक्यांसाठी वरदान ठऱलेले आहे. धरणातून उन्हाळी हंगामात तीन आवर्तने होतील अशी अपेक्षा होती. त्यातील पहिले आवर्तन काही दिवसांपुर्वीच संपले. मात्र दोन दिवसांपासून डाव्या कालव्याच्या दरवाजाला गळती सुरु झाली.

काही कर्मचारी व शेतकऱ्यांनी संगणमताने ही गळती केल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी रात्री दरवाजातून पाणी सोडण्यात आले. मात्र ते जास्त सुटल्याने थेट हंगेवाडीच्या शिवारात आले आणि बोभाटा झाला. त्यामुळे घाईने शनिवारी सकाळी पाणी बंद करण्याची लगबग झाली मात्र गळती कायम राहिली. त्यामुळे गळतीचे पाणी कालव्यात बंद करुन ते नदीला काढण्यात आले आहे. सध्या सुमारे दहा क्युसेक्सने गळतीचे पाणी सुरु आहे.

यापुर्वीही उन्हाळ्यात अनेकवेळा पाण्याची चोरी अशीच केले गेली. 'सकाळ'ने वारंवार हा प्रकार उघड केला मात्र अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची प्रतिक्रिया दिल. मात्र थेट कारवाई न झाल्याने पुन्हा हा प्रकार घडला. अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी सांगितले की, संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई होईल.

दरम्यान या गळतीमुळे उन्हाळ्यातील तीसरे आवर्तन होण्याची शक्यता धुसर आहे. कारण धरणात दोन हजार ९०० दशलक्षघनफूट उपयुक्त पाणी आहे. रोज दहा ते बारा दशलक्षघनफूट पाणी कमी होत आहे. त्यामुळे पुढच्या अडीच महिन्यात पाऊण टीएमसी पाणी कमी होतानाच एका आवर्तनात सव्वा टीएमसी पाणी लागणार आहे. त्यामुळे शेवटच्या आवर्तानाला पाणीच शिल्लक राहते की नाही अशी भिती आहे.

गळती करण्यात येत असल्याची माहिती खरी आहे. त्याबाबत संबंधितांना योग्य शब्दात विचारणा केली असून यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येतील. यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल.
- दिलीप साठे, उपअभियंता घोड धरण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT