Women's aggression against illegal trades
Women's aggression against illegal trades 
अहमदनगर

अवैध धंद्यांविरुद्ध महिला आक्रम... पोलिस ठाण्यासमोर ठिय्या 

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : राहुरी फॅक्‍टरी येथील प्रसादनगरमध्ये काल (सोमवारी) रात्री साडेआठ वाजता पोलिसांनी दारूअड्ड्यावर छापा घातला. तेथे पोलिस पथकावर हल्ला झाला. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. मात्र, नंतर त्यास सोडल्याचा आरोप करीत महिलांनी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या दालनासमोर आज ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, "या घटनेची चौकशी करून कारवाई करू. राहुरी फॅक्‍टरी परिसरातील अवैध धंदे दोन दिवसांत बंद करू,' असे आश्वासन पोलिस निरीक्षक देशमुख यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अलका पटारे, मोनिका बोबडे, कविता साळवे, लक्ष्मीबाई पंडित, जनाबाई सगट, ताईबाई बोर्डे, सुवर्णा मोकळ, लता जगताप, बोरनबाई गायकवाड, राधाबाई सरोदे, येलनबाई गायकवाड, सारिका ओहोळ (सर्व रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्‍टरी) यांनी आंदोलनात भाग घेतला. 15 दिवसांपूर्वी याच महिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात आंदोलन केले होते. 
प्रसादनगर (राहुरी फॅक्‍टरी) येथे दारू, मटका, जुगारअड्डे राजरोस सुरू आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होतो. अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली. कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने अवैध धंदे बंद करण्याची मागणी महिलांनी केली.

दरम्यान, काल (सोमवारी) रात्री साडेआठ वाजता प्रसादनगर येथे दारूअड्ड्यावर पोलिस पथकावर हल्ला झाला. त्या वेळी एका आरोपीला रात्रीच पोलिसांनी सोडून दिले. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक देशमुख यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेतले.  अहमदनगर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT