keshav chavan
keshav chavan 
अहमदनगर

पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

गौरव साळुंके

श्रीरामपूर (नगर) : विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील भोकर परिसरात गुरुवारी घडली. केशव बाळासाहेब चव्हाण (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून विहिर पाण्याने तुंडूब भरलेली असल्याने रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध सुरु होता. अखेर आज सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. केशन हा मित्रासोबत काल दुपारी भोकर येथील सुनील फासाटे यांच्या वडजाई परीसरातील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. गेल्या तीन दिवसांपासून केशव हा आपल्या वडीलांसोबत पोहायला शिकत होता. 

परंतु काल आईवडील बाहेरगावी गेल्याने तो एकटाच मित्रासोबत दुपारी दोन वाजेच्या सुमारास विहिरीवर पोहण्यासाठी गेला. पोहत असताना त्यांने विहिरीच्या कठड्यावरुन पाण्यात उडी मारली आणि पाण्याबाहेर आलाच नाही. याप्रसंगी विहीरीच्या कठड्यावर सुनील फासाटे बसलेले असल्याने यांनी ओरडा केल्यानंतर परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावले. परंतु विहीर पाण्याने तुंडूब भरलेली असल्याने केशवला वाचविण्यात अपयश आले. सदर घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला कळाल्यानंतर केशवचा शोध घेण्यासाठी जलतरणपटू घटनास्थळी पोहचले. परंतु रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. अखेर  आज सकाळी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. 

बाळासाहेब चव्हाण यांचा केशव हा मुलगा होता. त्यांच्या मागे आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. बाळासाहेब यांना तो एकटाच असून यापूर्वी यांच्या  एका मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आज सकाळी अकस्मात मृत्युची नोंद झाली. तालुक्यात यापूर्वी विविध ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या अनेक तरुणांचा मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

पालकांनो सावधान पोहण्याचे आकर्षण धोकादायक

तालुक्यात यंदा सर्वदुर समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने विहिरी, नद्या, नाले, बंधारे, गावतळे पाण्याने तुंडूब भरलेली आहेत. त्यामुळे शिवारात पोहण्याची तालिम सुरु झाली आहे. यंदा अनेक लहान बालके पोहायला शिकल्याचे दिसुन येते. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने घरी असलेली तरुणाई दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी विहीरीकडे आकर्षित होते. पोहतांना अनेकदा मित्रमंडळी विहिरीच्या कठडावर मस्ती करतात. आईवडील घरी नसल्याची संधी साधून अनेक तरुण पोहण्यासाठी जातात. आणि जीव धोक्यात घालतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT