ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

Women’s T20 World Cup 2024 India’s full schedule :
Women’s T20 World Cup 2024 India’s full schedule News Marathi
Women’s T20 World Cup 2024 India’s full schedule News Marathisakal

ICC Women’s T20 World Cup 2024 Fixture Schedule announced : यंदा बांगलादेशमध्ये होणाऱ्या महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 चे आयसीसीने वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय महिला संघाला अ गटात स्थान देण्यात आले आहे. त्यात पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचेही संघ आहेत.

तीन ऑक्टोबरपासून या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. जो चार ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.

Women’s T20 World Cup 2024 India’s full schedule News Marathi
Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 6 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. यानंतर टीम इंडियाचा सामना क्वालिफायर 1 च्या टीमशी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 13 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे.

तर पहिल्या सेमीफायनल 17 ऑक्टोबरला आणि दुसरा सेमीफायनल 18 ऑक्टोबरला खेळला जाईल. अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Women’s T20 World Cup 2024 India’s full schedule News Marathi
T20 World Cupपूर्वी प्रमुख गोलंदाज झाला जखमी, दुखापतीमुळे संपूर्ण IPL हंगामातून बाहेर

आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये एकूण 23 सामने खेळले जाणार आहेत. हे सामने ढाका आणि सिलहटमध्ये 19 दिवसांत होतील. स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. अ गटात पाच संघ आहेत. ब गटातही पाच संघ आहेत.

अ गटात - भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि क्वालिफायर 1

ब गटात - दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि क्वालिफायर 2

Women’s T20 World Cup 2024 India’s full schedule News Marathi
'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

भारतीय महिला संघाला अद्याप टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. यामध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक जेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाने 6 वेळा विजेतेपद पटकावले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी 1 वेळा विजेतेपद पटकावले आहे. टीम इंडिया फक्त एकदाच फायनलमध्ये पोहोचली होती ती पण 2020 मध्ये. पण त्याचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com