जन्मठेप sakAL
अहिल्यानगर

अहमदनगर : श्रीगोंद्यात दोन जणांना जन्मठेप

पीडित त्याच शेतामध्ये मजुरीने कामास जात होती

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी भानुदास गंगाराम भिसे (धारकरवाडी, चिंभळे) व नामदेव अंबू अडागळे चिंभळे यांना येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी बलात्कार, तसेच बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम ३ व ४ अन्वये जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली.

या खटल्यातील आरोपी भानुदास भिसे व नामदेव अडागळे या दोघांनीही दोन शेतकऱ्यांची शेती वाट्याने घेतली होती. पीडित त्याच शेतामध्ये मजुरीने कामास जात होती व तेथेच कुटुंबासह राहत होती. फिर्याद देण्याच्या पाच महिने अगोदर पीडित घराच्या मागील उसाच्या पिकाकडे प्रातर्विधीसाठी गेली असताना तेथे आरोपी भानुदास भिसे आला व त्याने तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केला व कोणाला सांगू नको, असा दम दिला. त्यानंतर पुन्हा पीडितेवर अत्याचार झाले. दरम्यान, फिर्यादीची मुलगी घरी एकटीच असताना दुपारी आरोपी नामदेव अडागळे यानेही बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानेही, कोणाला सांगितल्यास आईला ठार मारीन अशी धमकी दिली. दरम्यान, मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिची सोनोग्राफी केली असता ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने वरीलप्रमाणे घडलेली घटना सांगितली. याप्रकरणी आरोपींना विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी फिर्याद देण्यात आली.

दरम्यान, पीडित मुलीने बाळाला जन्म दिला. या खटल्याची सुनावणी श्रीगोंदेतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांच्यासमोर झाली. आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी, पीडित मुलगी व डॉक्टर, ग्रामसेवक, तपासी अधिकारी यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या.

याप्रकरणी फिर्यादी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता अॅड. पुष्षा कापसे-गायके यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

Xiaomi 18 Pro Series होणार लाँच! 8500mAh बॅटरी, ड्युअल 200MP Leica कॅमेरा; पाहा नव्या फ्लॅगशिपचे भन्नाट फीचर्स!

Mumbai Water Metro: मुंबई वॉटर मेट्रोसाठी समुद्रतळाचा मोठा अडथळा; खडकाळ भागात ‘रॉक ड्रेजिंग’, २५० किमी जलमार्गांचा विकास

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT