Dam water 
अहिल्यानगर

श्रीगोंद्यात पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

डीवाय १३२ वितरिका पुन्हा चर्चेत, वितरिकेवरील उपसा पाइप मोहिमेला विरोध

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : कुकडीची तालुक्यातील सर्वात मोठी असणारी डीवाय १३२ ही वितरिका याही आवर्तनात चर्चेत आली. यावेळी वितरिकेतून पाणी घेण्यासाठी टाकलेले पाइप काढण्यासाठी आलेली यंत्रणा थांबवावी, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी काल गोंधळ घातला. त्याबाबत आज तहसील कार्यालयात बैठक झाली.

पोटचाऱ्या करून त्यानंतर पाइप काढण्याची भूमिका जलसंपदा विभागाने घेतली असली, तरी या आवर्तनात ते होणार की नाही याबाबत संदिग्धता आहे. दरम्यान, याचप्रश्नी या वितरिकेवरील टेलचे शेतकरीही पाण्यासाठी आक्रमक होणार आहेत.

डीवाय १३२ या वितरिकेचे वितरण व पाणीपट्टी वसुलीसाठी स्वतंत्र खासगी यंत्रणा ठेकेदारी पद्धतीने नेमली. जलंसपदाच्या बाहेरील यंत्रणेने पाणी खालच्या भागाला देण्यासाठी वितरिकेवरील उपसा पाइप काढण्याची मोहीम सुरु केली. त्या मोहिमेला लोणीव्यंकनाथ येथील शेतकऱ्यांनी विरोध केला. राज्य बाजार महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी ही मोहीम थांबविली. जलसंपदाचे कर्मचारी व नाहाटा यांच्यात वादही झाले.

नाहाटा यांचे म्हणणे होते की, पोटचाऱ्याच न राहिल्याने शेतकरी उपसा करतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय करू नये. हा वाद वाढून पोलिस ठाण्यापर्यंत गेला. मात्र, याप्रश्नी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी हस्तक्षेप करीत तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी त्यांच्या दालनात दोन्ही बाजूंची आज बैठक घेतली. तीत दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी निर्णय घ्यावा, असे सांगितल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : दिल्ली येथे २०९ किलो वजन असलेल्या 'सुपर-सुपर ओबेसिटी'च्या रुग्णावर यशस्वी बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT