IND vs NZ 4th ODI: विराट कोहली शून्यावर क्लिनबोल्ड अन् झाली सचिन तेंडुलकरच्या 'नकोशा विक्रम'शी केली बरोबरी

Virat Kohli Joins Sachin Tendulkar at Top of Unwanted ODI Record: न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या वनडेत भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यामुळे त्याने सचिन तेंडुलकरच्या एका नकोशा विक्रमाशी बरोबरी केली आहे.
Virat Kohli | India vs New Zealand 4th ODI

Virat Kohli | India vs New Zealand 4th ODI

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 4th ODI: विराट कोहलीने आत्तापर्यंत अनेक महत्त्वाचे आणि मोठे विक्रम केले आहेत. त्याने अनेकदा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे विक्रमही मोडले आहेत. मात्र एका नकोशा विक्रमाच्या यादीतही शुक्रवारी विराट कोहलीने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. (Virat Kohli Joins Sachin Tendulkar at Top of Unwanted ODI Record)

शुक्रवारी माऊंट मौंगानुई येथे भारत आणि न्यूझीलंड संघात चौथा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताचा निराशाजनक पराभव झाला. न्यूझीलंडने २४४ धावांनी भारताला पराभूत करत मालिकेत पुनरागमन केले.

Virat Kohli | India vs New Zealand 4th ODI
IND vs NZ, 4th ODI: विराट, रोहित, श्रेयस यांना पहिल्याच ओव्हरमध्ये कसं आऊट केलं? मॅट हेन्री म्हणाला, 'हे खूप मजेदार होतं...'
Loading content, please wait...