jail
jail sakal
अकोला

गतिमंद लैंगिक शोषण; १० वर्षांचा कारावास

सकाळ वृत्तसेवा

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील एका गतिमंद मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण करून तिला गरोदर करणाऱ्या नराधम युवकास पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश शायना पाटील यांच्या न्यायालयाने मंगळवारी (ता.२२) १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

मूर्तिजापूर तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी प्रवीण उर्फ तुकाराम कपुरचंद चव्हाण याच्याविरुद्ध त्याच्या नात्यातील १० वर्षीय गतिमंद बालिकेवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती करणे आणि गैर मार्गाने तिचा गर्भपात केल्याचा आरोप होता. अन्य आरोपी त्याची बहीण दिपाली गोपाळ चव्हाण, गणपत जेजराव सोळंके व डॉ. दयाल रामजी चव्हाण यांनी गर्भपात करण्यास मदत केल्याचा आरोप होता. पीडितेचे आई-वडील कामाकरिता बाहेर गेल्यावर आरोपी प्रवीण उर्फ तुकाराम कपुरचंद चव्हाण हा पीडितेचे लैंगिक शोषण करायचा.

पीडिताला पोटात दुखत असल्याने तिला दवाखान्यात नेले व तिच्या आई-वडिलांना खोटी माहिती देऊन गर्भपात करण्यासाठी त्यांची संमती प्राप्त केली. परंतु पीडितेकडून प्रवीण चव्हाणच्या दुष्कृत्याबाबत माहिती कळल्यानंतर त्याच्या विरुद्ध ता. १८ जून २०१८ रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासणी करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी प्रवीण उर्फ तुकाराम कपुरचंद चव्हाण हा फरार असल्यामुळे इतर आरोपींविरुद्ध खटला सुरू करण्यात आला. नंतर आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र सादर केले. सरकारपक्षाने १९ जणांच्या साक्षी नाेंदविल्या. साक्ष व पुरावे ग्राह्य मानुन पहिले न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम ३७६ (२) (एन) व पॉक्सो कायदा कलम पाच-सहा मध्ये १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास दोन महिन्याची अतिरिक्त शिक्षा ठोठावली. कलम ५०६ मध्ये सात वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा ठोठावली. सर्व शिक्षा आरोपीस एकत्रित भोगावयाच्या आहेत. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी विधिज्ज्ञ ॲड. मंगला पांडे, सहायक सरकारी विधिज्ज्ञ ॲड. किरण खोत यांनी बाजू मांडली. पीएसआय संदीप मडावी व धनंजय रत्नपारखी प्रकरणाचा तपास केला होता.

पीडितेसह तिचे वडील न्यायालयात फितूर

या प्रकरणातील मुख्य साक्षीदार म्हणजे पीडिता आणि तिचे वडील होते. न्यायालयात दोघेही फितूर झाले. परंतु त्यांनी पोलिसांना यापूर्वी दिलेल्या जबाब व अन्य साक्ष, पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने निर्वाळा देत शिक्षा सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT