vaccination
vaccination sakal
अकोला

अकोला : १८ हजार कोव्हॅक्सिनच्या लसी मिळाल्या

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यातील नागरिकांसाठी लसींचा तुटवडा जाणवत असतानाच आरोग्य विभागाला शनिवारी (ता. १९) कोव्हॅक्सिन लसींचे १८ हजार डोस मिळाले आहेत. त्यामुळे जुने व आताचे मिळून जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसींचे २३ हजार डोस शिल्लक आहेत, तर १ लाख कोव्हिशिल्ड लसीचे डोस सुद्धा उपलब्ध आहेत. लसींचा साठा उपलब्ध झाल्याने आता लसीची मुदत संपलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला विशेष महत्व आहे. पहिल्या लाटेनंतर लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत आरोग्य विभागामार्फत नागरिकांच्या लसीकरणावर जोर देण्यात येत आहे. अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी यासाठी नागरिकांना लस सुद्धा मोफत देण्यात येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लस घेणाऱ्यांवर विषाणूचा हल्ला झाल्यानंतर सुद्धा लसवंतांना फारसा प्रभाव न झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे. तिसऱ्या लाटेत सुद्धा लसवंत विषाणूपासून सुरक्षित होते, अशी माहिती डॉक्टर देत आहेत. दरम्यान लसीकणाची शासनाने वाढवली असानाच लसींच्या तुटवड्याचा सामना जिल्हावासियांना करावा लागत आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम सुद्धा प्रभावित होत आहे. परंतु शनिवारी (ता. १९) जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सिनच्या १८ हजार लसी मिळाल्या आहेत. त्यामुळे लसीकरणाची गती वाढेल.

अशी आहे लसवंतांची स्थिती

  •  एकूण लसवंत - १९ लाख २६ हाजर ७१२

  •  पहिला डोस - ११ लाख ८५ हजार २२८

  •  दुसरा डोस - ७ लाख २९ हजार ८३

  •  बूस्टर डोस - १२ हजार ४०१

मुदत संपलेल्यांना प्राधान्य

जिल्ह्यातील ३४ हजार लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. लसींचा साठा उपलब्ध नसल्याने त्यांना लस मिळत नसल्याचे वास्तव आहे. परंतु आता जिल्ह्यासाठी २३ हजार कोव्हॅक्सिनचे डोस मिळाल्याने लाभार्थ्यांची अडचण दूर झाली आहे. आरोग्य विभाग सुद्धा लसीची तारीख ओलांडलेल्या लाभार्थ्यांनाच प्राधान्य देणार आहे.

‘प्रतिबंधात्मक डोस’कडे पाठ

पंतप्रधान मोदी यांनी १० जानेवारी पासून फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठांना प्रतिबंधात्मक डोस देण्याचेही जाहीर केले आहे. त्यानुसार संबंधितांना डोस देण्यात येत आहेत. परंतु अद्याप केवळ १२ हजार ४०१ लाभार्थ्यांनीच प्रतिबंधात्मक डोस घेतला आहे. इतर बूस्टर डोसकडे कानाडोळा करत आहेत.

जिल्ह्यासाठी शनिवारी (ता. १९) कोव्हॅक्सिन लसींचे १८ हजार डोस मिळाले. त्यातून मुदत संपलेल्या ३४ हजार लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. सध्या जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचे २३ हजार तर कोव्हिशिल्डचे १ लाख डोस उपलब्ध आहेत.

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा लसीकरण अधिकारी, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT