कडक लॉकडाउनमध्ये १५ हजारांवर वाहनांवर कारवाई; ६०० वाहने जप्त
कडक लॉकडाउनमध्ये १५ हजारांवर वाहनांवर कारवाई; ६०० वाहने जप्त 
अकोला

कडक लॉकडाउनमध्ये १५ हजारांवर वाहनांवर कारवाई; ६०० वाहने जप्त

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना (Corona) विषाणूचा वाढता संसर्ग बघता शहरासह जिल्ह्यात कडक लाकडाउन लावण्यात आला होता. त्यानंतरह अकोलेकर रस्त्यावर होते. त्यात विनाकार फिरणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे महिनाभरात वाहतूक शाखेने १५ हजार वाहनांवर केलेल्या कारवाईतून स्पष्ट होते. या काळात नियम मोडणारी ६०० वाहनेही जप्त करण्यात आली आहे. Action on 15,000 vehicles in strict lockdown; 600 vehicles seized


कोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह्यातील आलेख चढताच आहे. परिणामी नागरिकांना विनाकारण रस्त्यावर न फिरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणांकडून करण्यात आले आहे. या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत अकोलेकर रस्त्यावरच फिरत होते की काय, असा प्रश्न वाहतूक शाखेने महिनाभरात केलेल्या जम्बो कारवाईने उपस्थित केला आहे.

लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर ता१५ एप्रिलपासून जिल्ह्यात संचारबंदी होती. जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी या काळात संचारबंदीचे काटेकोरपणे पालन होईल यादृष्टीने पालन केले.

वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्यावर या काळात विनाकारण फिरणारे व जवळ वैध कागदपत्रे न बाळगणाऱ्या वाहनांच्या तपासणीची विशेष जबाबदारी होती. त्यांनी व त्यांच्या टीमने कारवाई करीत नियम मोडणाऱ्यांवर अकोला शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये दखल पात्र गुन्हे दाखल केले. ता.१५ एप्रिल ते १५ मे या एक महिन्याच्या कालावधीमध्ये वाहतूक शाखेने एकूण १४ हजार ७५३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे कडून आठ लाख १५ हजार ४०० रुपये दंड वसूल केला. संचारबंदीचा भंग करून कोणतेही सबळ कारण नसताना फिरतांना आढळून आलेल्या एकूण ५८६ वाहन चालकांची वाहने जप्त करून त्यांची वाहने शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली. त्यांचे विरुद्ध दखल पात्र गुन्हे दाखल केले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे निर्देशाप्रमाणे व अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके, पोलिस उपनिरीक्षक सुरेश वाघ व वाहतूक पोलिसांनी केली.

संपादन - विवेक मेतकर

Action on 15,000 vehicles in strict lockdown; 600 vehicles seized

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT