रणधीर सावरकर sakal
अकोला

Akola News : अकोल्यात अतिरिक्त प्रादेशिक कार्यालय मंजूर; आमदार रणधीर सावरकर यांची माहिती

ही मागणी दीर्घ काळापासून शासन मंजुरीच्या प्रतिक्षेत होती

सकाळ डिजिटल टीम

अकोला : अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यासाठी अकोला येथे एमआयडीसीचे स्वतंत्र अतिरिक्त प्रादेशिक कार्यालय तातडीने कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे आमदार रणधीर सावरकर यांनी केली होती. या मागणीला यश आले असून लवकरच हे कार्यालय कार्यान्वित होईल अशी माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.

ही मागणी दीर्घ काळापासून शासन मंजुरीच्या प्रतिक्षेत होती. सदर कार्यालय सुरु करण्याकरिता शासनाने मान्य सुद्धा केले होते. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतू वित्त विभागाने काढलेल्या त्रुटी पुर्तेते अभावी सदर प्रस्तावाची मंजुरी प्रलंबित होती. वित्त विभागाच्या त्रुटीची पुर्तता करण्यात आल्याचे समजल्याने सदरचे कार्यालय अल्पावधीतच तातडीने सुरु करावे असा प्रस्ताव अवघ्या चार दिवसांपूर्वी आमदार रणधीर सावरकर यांनी सादर केला होता. त्याची दखल ना. उदय सामंत यांनी घेऊन त्या संदर्भातला अध्यादेश काढून अकोला जिल्ह्याला न्याय दिला आहे.

त्याबद्दल आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले. उद्योगाला चालना देण्यासाठी पश्चिम विदर्भाला न्याय दिल्याबद्दल व गतिशील शासन असल्याचा प्रत्यय देऊन शासनाने विकासाचा मार्ग प्रशस्त केल्याची भावना आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली. या कार्यात आमदार वसंत खंडेलवाल, खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. स्व. माजी आ.गोवर्धन शर्मा यांचे सातत्याने या प्रश्नासाठी आग्रही होते, त्यांची इच्छापूर्ती व त्यांची मागणी यानिमित्ताने पुर्ण झाली आहे. एमआयडीसी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा याबद्दल आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT