Akola News
Akola News sakal
अकोला

Akola News : महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे विणावे,बुवनेश्वरी. एस ; विदर्भातील १४ महिलांचा कृषी विद्यपिठाने केला सन्मान

सकाळ वृत्तसेवा

अकोला : आता एकट्याने नव्हे तर समूहाने एकत्रित येत सर्वच शासकीय निमशासकीय विभागांचे सहयोगातून स्वतःचा आणि पर्यायाने गावाचा विकास करण्यासाठी महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे विणावे असे आवाहन वाशीमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले. पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंग या त्रिसूत्रीचा अतिशय समर्पक वापर उलगडताना श्रीमती बुवनेश्वरी एस. एका गावाचे १०-१० ब्रँड न करता सर्व मिळून गुणवता व आर्थिक निकषावर बाजारात टिकणारा एकच ब्रँड आणल्यास खऱ्या अर्थाने शाश्वत ग्रामविकास दृष्टीपथात येईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला द्वारा जागतिक महिला दिनाचे पार्श्वभूमीवर आयोजित ‘विदर्भस्तरीय महिला सक्षमीकरण मेळावा व स्त्रीशक्ती उत्सव’प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. कृषी महाविद्यालय अकोलाच्या समिती सभागृहात आयोजित या अतिशय महत्त्वाकांक्षी आणि तितक्याच भावनाप्रधान सोहळ्याचे प्रसंगी वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ.सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, रिलायन्स फाउंडेशन चे राज्य समन्वयक सचिन महातळे यांचेसह आयोजक संचालक विस्तार शिक्षण, डॉ. धनराज उंदीरवाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

तर सहयोगी अधिष्ठाता डॉ.ययाती तायडे, डॉ. राजेंद्र गाडे, डॉ. शैलेश हरणे यांचे सह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील महिला अधिकारी कर्मचारी, संपूर्ण विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राचे माध्यमातून कृषी उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षण मातृशक्ती सभागृहात उपस्थित होती. याप्रसंगी संपूर्ण विदर्भातून आपल्या कार्यकुशलतेने, जिद्दीने, परिश्रमाने संकटसमयी देखील न डगमगता नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आपल्या परिवाराला सावरणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या शुभहस्ते ‘प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.

यामध्ये कुसुमताई प्रमोद झाडे (मु.पो. सिंधी रेल्वे ता. जिल्हा वर्धा), वर्षा तुळशीदास लांजेवार (मु.पो.चिंधीचक ता. नागभीड जि.चंद्रपूर), सौ. दुर्गा सुनील सोनवणे (मु.पो. सुलज ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा), प्रिया महिपाल गेडाम (मु.पो.कुकदीपानजरा, ता. काटोल, जि.नागपूर), तृप्ती विनोद महाले (मु.पो.ता.मेहकर जि.बुलढाणा), दुर्गा दीपक वर्मा (मु.पो.ता. जि.गोंदिया), श्रीमती साधना सतीश सराड (मु.पो.सारफळी, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ), मोनिका विंचुरकर (मु.पो.अमरावती), अंजली अनिल डोरले (मु.पो. भोजापुर, ता.जि. भंडारा), विजयमाला गणेश देशमुख (मु.पो.करडा जि.वाशिम), कविता परमेश्वर येवले (मु.पो.पाळोदी, ता. दारव्हा, जि.यवतमाळ), किरण वासुदेवराव लोहकरे (मु.पो.लोणी, ता. नांदगाव. जि. अमरावती), वंदना अशोक घावडे (मु.पो. जीवनगट्टा ता. एटापल्ली, जि.गडचिरोली) व सुनीता ठाकरे (मु.पो.ता.बार्शीटाकळी,जि. अकोला) इत्यादी महिला सत्कारमूर्तिना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, विद्यापीठ कृषी संवादिनी व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रेरणा चिकटे यांनी तर आभार प्रदर्शन कृषि विज्ञान केंद्राच्या विषयतज्ञ कृतिका गांगडे यांनी केले.

एकात्मिक प्रयत्न काळाची गरज : डॉ. शरद गडाख

सध्या शहरीकरणाकडे वाढलेला युवक-युवतींचा ओढा थांबवत गाव खेड्यांमध्ये चैतन्य फुलविण्यासाठी ग्रामीण भागात उत्पादित होणाऱ्या शेती आणि शेतीपूरक उत्पादनांवर गाव पातळीवर प्रक्रिया करणे गरजेचे असून प्रत्येक गावं आदर्श होणेसाठी सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थाचे एकात्मिक प्रयत्न काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT