Shiva Mohod
Shiva Mohod sakal
अकोला

Shiva Mohod : अकोल्यात अजित पवार गटाला धक्का; शिवा मोहोड शिवबंधनात

योगेश फरपट

अकोला - लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीला वेग आला असताना अचानक अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्या दबावाला कंटाळून शहर आणि ग्रामीणमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे व आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कमी वयात अनेक राजकीय पदे भूषविणारे शिवा मोहोड यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

सोमवारी २२ एप्रिल रोजी अमरावती येथील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले. दरम्यान त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गंभीर आरोप सुद्धा केले आहेत. मिटकरींना असेच पाठीशी घातले तर अनेक जण रामराम ठोकतील असा इशाराही दिला आहे.

जिल्हयात जवळपास सर्वच पक्षात राजकीय धुसफूस सुरु आहे. कोण कोणत्या पक्षात जाईल काही सांगता येत नाही. त्याचा परिणाम निश्चितच अकोला लोकसभा निवडणूकीवर होण्याची शक्यता आहे. भाजप, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्तेही काहीना काही कारणाने पक्ष सोडून दुसरीकडे स्थंलातरीत होताना दिसत आहेत.

जिल्हयात सहकारी लॉबी स्ट्‍रँग असून एकेकाळी जिल्हयात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दबदबा होता. आज मात्र तो नाहीसा झालेला दिसतो. शिवाय अंतर्गत गटबाजीही मोठ्‍या प्रमाणात वाढली असल्याचे दिसते. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसपासून आपल्या राजकारणाची आणि शिवसंग्रामपासून समाजकारणाची सुरुवात करणारे शिवा मोहोड यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करून मोठे जनमत निर्माण केले.

केवळ अकोला शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा मोठा युवक वर्ग आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद यशस्वीरीत्या सांभाळून महानगरपालिकेत नगरसेवक, सभापती, सभागृह नेता पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.

शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही कानशिवणी जिल्हा परिषद निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून त्यांनी आपले ग्रामीण भागातील वर्चस्व सिद्ध केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर शिवा मोहोड अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले.

परंतु तेथे त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची योग्य दखल आमदाराच्या दबावामुळे घेतल्या गेली नाही. शिवाय ज्यांच्यात कोणतीही निवडणूक लढविण्याची किंवा निवडून येण्याची क्षमता नाही अशा लोकप्रतिनिधींमुळे त्यांना अनेक खोट्या आरोपांना आणि अडचणींना सामोरे जावे लागले. विकास निधीमध्ये अडथळे येऊ लागले, असे सांगून त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

त्यानंतर ते कोणत्या पक्षात जातात याकडे लक्ष लागले होते. अखेर सोमवारी त्यांनी अमरावती येथील एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खा. अरविंद सावंत, जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर यांच्या मार्गदर्शनात तसेच आ. नितीन देशमुख व जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या नेतृत्वात शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे आता शहरी व ग्रामीण भागात शिवसेना उबाठा पक्षाची ताकद आणखी वाढणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिवसेना ‘उबाठा’ची ताकद वाढणार

बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितिन बापू देशमुख हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. सध्या या गटात जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर हेही आहेत. दोन्ही नेते पॉवरफूल असून पक्षवाढीच्या दृष्टीने त्यांचे चांगले प्रयत्न सुरु आहेत. त्यात युवा नेते शिवा मोहोड यांची साथ आता लाभणार आहे. पक्षसंघटनाच्या दृष्टीने ही महत्वाची राजकीय घडामोडी समजली जात आहे.

लोकसभेसाठी पोषक

लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने शिवा मोहोड यांची मदत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना होवू शकते. शिवाय मोहोड यांच्या रुपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चांगला नेता मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT