Akola Buldana News 228 Gram Panchayat Administrator from today
Akola Buldana News 228 Gram Panchayat Administrator from today 
अकोला

जिल्ह्यातील २२८ ग्रामपंचायतींवर आजपासून ‘अधिकारी राज’ मुदत संपल्याने प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू

अरूण जैन

बुलडाणा :  जिल्ह्यातील ५२८ ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात संपत आहे. यापैकी २२८ ग्रामपंचायतींची मुदत आज संपत असल्याने उद्यापासून २२८ ग्रामपंचायतींवर अधिकाऱ्यांचे राज्य असणार आहे. जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांमधील अधिकारी प्रशासन म्हणून ग्रामपंचायतीवर जाणार आहेत.


बुलडाणा जिल्ह्यातील ५२८ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतींच्या निवडणुका अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने अशासकीय सदस्यांना ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या निर्णयानुसार ३० ऑगस्टला मुदत संपणाऱ्या २२८ ग्रामपंचायतींवर आजपासून प्रशासकीय अधिकारी कारभार पाहणार आहेत. बुलडाणा तालुक्यातील ५१, देऊळगाव राजा २६, मलकापूर ३३, खामगाव ७१, जळगाव जामोद २४, संग्रामपूर २७, लोणार १७, चिखली ६०, शेगाव ३४, सिंदखेड राजा ४३, नांदुरा ४८, मोताळा ५२, व मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहेत.

जिल्ह्यातील रिक्त ग्रामपंचायतीची संख्या व जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्यामध्ये तफावत होत असल्याने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शाखा अभियंता यांच्यावर देखील ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. ग्रामपंचायतींची संख्या जास्त असल्यामुळे एका अधिकाऱ्याकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा कार्यभार दिला जाण्याची शक्यता आहे.


शासनाने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतल्यानंतर गावागावांमध्ये आता आपल्या ग्रामपंचायतीवर कुणाला प्रशासक नेमणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. बिगर राजकीय व्यक्तीला प्रशासक म्हणून नेमावे व यासाठी पालकमंत्र्यांच्या संमतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित व्यक्तीची नेमणूक करतील अशी तरतूद होती. मात्र या संदर्भात शासनाचे कोणतेही आदेश नसल्याचे कळते.

प्रक्रिया अंतिम टप्प्यात ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून अधिकाऱ्यांना नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अधिकाऱ्यांमध्ये इतर बिगर राजकीय व्यक्तींना नेमण्यात संदर्भात कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे विविध खात्यांमधील अधिकाऱ्यांकडे हे प्रशासक पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे.
-राजेश लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद बुलडाणा.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT