akola buldana news Shocking type; The bodies from the cemetery were brought to the streets by stray dogs 
अकोला

धक्कादायक प्रकार; स्मशानभूमीतील मृतदेह भटक्या कुत्र्यांनी आणले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेेवा

बुलडाणा : कोरोना काळात मृतांचा आकडा वाढल्याने कमी जागेत होतो दफनविधी केला जात आहे. मात्र असे असले तरी मलकापूरमधल्या सर्वधर्मीय स्मशानभूमीतला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीतील मानवी अवयव रस्त्यावर येत आहे. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्याने दफन केलेले पार्थिव भटके कुत्रे उकरुन काढून रस्त्यावर आणत आहेत. दरम्यान मृतदेहांची अवहेलना होत असल्याने नागरिकांसह नगसेवकही संतप्त झाले असून सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी करत आहेत.

मलकापूर शहरात नदी काठावर माता महाकाली वॉर्ड परिसरात असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीतील हा प्रकार आहे. या स्मशानभूमीची नदी पात्राकडील संरक्षण भिंत ही गेल्या काही वर्षांपासून क्षतिग्रस्त होऊन पडलेली आहे. त्यामुळे नदी पात्राकडून ही स्मशानभूमी उघडीच आहे. या स्मशानभूमिमध्ये सर्वधर्मिय मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात तर काही दफनही केले जातात. मात्र याठिकाणी आता जागा अपुरी पडू लागल्याने दफन करण्यात येणाऱ्या मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

कोरोना काळात मृतांचा आकडा वाढल्याने सध्या स्मशानभूमीत जागा कमी पडू लागली आहे. कमी जागेत दफनविधी करण्यात येत आहे. अशातच शहरातील आणि परिसरातील मोकाट कुत्रे हे स्मशानभूमीत जाऊन त्याठिकाणी पुरण्यात आलेले मृतदेह उकरुन काढत आहेत. तसंच हे मृतदेह फरफटत नेण्याचाही प्रकार घडत आहे. याशिवाय काही प्रेतांचे लचके तोडण्याचीही बाब समोर आल्याने जनभावना दुखावल्या जात आहेत. काही मृतदेहांचे सांगाडे या परिसरात पडलेले आढळून आल्यानंतर अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. नागरिकांनी स्मशानभूमीत सुरक्षारक्षक ठेवण्याची मागणी केली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT