

Palghar Farmers Face Crisis
ESakal
विक्रमगड : महाराष्ट्र राज्य सहकारी धान्य खरेदी महामंडळ अंतर्गत जव्हार प्रादेशिक कार्यालयामार्फत जानेवारी २०२६ पासून शेतकऱ्यांकडून उत्पादित धान्य (भात) खरेदीस सुरुवात करण्यात आली. नव्या नियमावलीनुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान्य ठरवून दिलेल्या खरेदी केंद्रांवर जमा केले, पण एक ते दीड महिना उलटूनही बँक खात्यावर पैसे जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.