Akola corona patient  
अकोला

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला

कारंजा, मंगरुळपीर हॉटस्पॉट: तीन दिवसात दिडशे बाधित

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : कोरोनामुक्त वातावरणात सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असताना आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. तीन दिवसात दिडशेच्या वर कोरोनाबाधीत रूग्णांची नोंद झाली आहे. कारंजा व मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक रूग्ण आढळून आले असून सध्या २०२ रूग्ण उपचार घेत आहेत. गेल्या आठ महिन्यात जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. प्रशासनानेही सर्व निर्बंध हटविले होते. सर्वच व्यवहार सुरळीत सुरू असताना अचानक गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. गेल्या तीन दिवसातच जिल्ह्यात दिडशेच्या वर कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. या संसर्गची तिव्रता कारंजा व मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक आहे.

कारंजा तालुक्यात गेल्या तीन दिवसात तब्बल ८८ रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच मंगरुळपीर तालुक्यात गेल्या तीन दिवसात ४६ रूग्ण नोंदले गेले आहेत. वाशीम व मालेगाव तालुक्यातही रूग्ण वाढत असून रिसोड व मानोरा तालुक्यात रूग्णवाढ आटोक्यात आहे. रूग्ण संख्या वाढत असली तरी प्रशासनाच्या वतीने अजून कोणत्याही उपाययोजना जाहीर केल्या गेल्या नाहीत. कारंजा व मंगरुळपीर तालुक्यात रूग्ण संख्येत वाढ दिसत असली तरी शहरी भागात रूगसंख्येच्या उद्रेकाचा आलेख चढता आहे. आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असले तरी वाढती रूग्ण संख्या पाहता चाचण्यांसाठी गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.

गर्दीवर आवर आवश्यक सध्या प्रशासनाने कोणतेही निर्बंध घातले नसल्याने बाजारपेठंमधे प्रचंड गर्दी होत आहे. मास्कचा वापरही कोणीच करत नसल्याने संसर्ग वाढत चालला आहे. प्रशासनाने मास्क लावणे सक्तीचे करणे आवश्यक आहे. दवाखाना, बाजारपेठ, बॅका, खानावळी, हाॅटेल या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. या ठिकाणी तरी मास्क व सामाजिक अंतर सक्तीचे करणे आवश्यक आहे.

नागरीकांनी शिस्त पाळण्याची गरज दोन वर्ष लॉकडाऊन व या दोन वर्षांत अनेकांना जिवाला मुकावे लागल्याचा अनुभव ताजा आहे. आता संसर्ग वाढत असताना नागरीकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. गर्दिच्या ठिकाणी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.

कोरोनाची सद्यस्थिती

  • पॉझिटिव्ह - ४६०८२

  • मयत - ६४१

  • डिस्चार्ज - ४५२४०

  • ॲक्टिव्ह रुग्ण - २०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT