CRIME sakal
अकोला

अकोल्यातील ‘बंटी बबली’ जेरबंद

तीन गुन्ह्यातील मुद्देमालही या जोडीकडून जप्त करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महिलांच्या गळ्यातील दागिणे चोरी करणाऱ्या अकोल्यातील ‘बंटी बबली’ला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. मोटारसायकलने येऊन मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिल्यांच्या गळ्यातील दागिण्यांवर ही जोडी हात साफ करीत होती. तीन गुन्ह्यातील मुद्देमालही या जोडीकडून जप्त करण्यात आला आहे.

डाबकी रोड पोलिस स्टेशन येथे ता. ४ सप्टेंबर रोजी अयोध्या नगर डाबकी रोड येथील रहिवासी शोभा अनिल वानखडे यांनी तक्रार दिली. त्या मॉर्निंग वाक करीत असताना अनोळखी आरोपीने मोटारसायकलने येवून त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन जबरीने तोडून पळ काढला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथिल सहायक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण व त्यांचे तपास पथकातील कर्मचारी यांनी सुरू केला होता. त्यांनी तांत्रिक विश्लेशणाचे व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपींना जेरबंद केले.

खडकी परिसरातील रहिवाशी प्रकाश भानुदास लोंढे (३०) व चांदूर येथील गजानन नगरात राहणारी शोभा अशोक कोरडे (३४) या ‘बंटी बबली’ला ता. १४ सप्टेंबर २०२१ रोजी ताब्यात घेतले. त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. सखोल विचारपुस केल्यानंतर या बंटी बबलीने खदान व जुने शहर पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यांचीही कबुली दिली. तिन्ही गुन्ह्यातील चोरीस गेलेला एकूण एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.

आरोपींना तपासासाठी डाबकी रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, सपोनि. नितीन चव्हाण, सपोउपनि. गोपीलाल मावळे, राजपाल ठाकुर, गणेश पांडे, संदीप काटकर, फिरोज शेख, शक्ती कांबळे, विरेंद्र लाड, गीता अवचार, अविनाश मावळे, विजय कबले यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT