Gram panchayat sakal
अकोला

Akola : थेट सरपंचपदाच्या निवडणुकीने राजकीय पक्ष मैदानात

ग्रामपंचायत निवडणुकीची उत्सुकता वाढणार; जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतची निवडणूक

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून त्यांच्या चिन्हावर सरपंचपदाचे उमेदवार उभे केले जाणार असल्याने निवडणुकीची उत्सुकता वाढणार आहे.

अकोला जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतीची निवडणूक डिसेंबरमध्ये होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, त्यातही ग्रामपंचायतच्या निवडणुकीत स्थानिक पॅनलला अधिक महत्त्व राहत आले आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांच्या आपसातील मदतभेदाची डोकेदुखी नको म्हणून कोणताही पक्ष थेट निवडणुकीत सहभागी होत नव्हता.

आता मात्र, थेट जनतेतून सरपंच निवडून दिल्या जाणार असल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोणत्या पक्षाचे प्राबल्य आहे, हे अधोरेखित होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी त्यांच्या चिन्हावर उमेदवार उभे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वंचित बहुज आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात अकोल्यातील सभेत सरपंच पदाच्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार दिले जाईल, असे जाहीर केले होते.

राज्यात शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे शिवसेनेचे दोन्ही गट त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सरपंचपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर उमेदवार देण्याची तयारी करीत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून त्यासंदर्भाच जिल्ह्यात चाचपणी सुरू झाली आहे.

आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधित निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेसंदर्भात सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची संयुक्त बैठक नियोजन भवनात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, अभयसिंह मोहिते, डॉ. नीलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार आदी उपस्थित होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुकानिहाय पथके तयार करावीत. प्रत्येक तालुक्यात ग्रामपातळीवरील यंत्रणेची बैठक घेऊन माहिती द्यावी. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

Anna Hazare Praises Tukaram Mundhe : "अशा डॅशिंग अधिकाऱ्यांची देशाला गरज"; तुकाराम मुंढेंच्या 'त्या' धडक मोहिमेवर अण्णा हजारे खूश, केलं तोंडभरुन कौतुक

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्याकांत प्रकरणात सियाच्या दोन मैत्रीणींकडेही चौकशी होणार

सरकारी रुग्णालयात प्रसुती झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी, राज्य सरकारचा मोठा निर्णय...

TrashBot : बारावीच्या विद्यार्थिनीने बनवला अद्भुत 'ट्रॅशबॉट' रोबो; कचरा बघताच पळत जाऊन करतोय साफसफाई, पाहून तुमचं डोकं चक्रावेल

SCROLL FOR NEXT