tiger
tiger  sakal
अकोला

अकोला जिल्ह्यात पट्टेदार वाघाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यातील पिंजर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सोनखास शिवारत मंगळवारी पहाटे एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे, ज्या भागात आतापर्यंत वाघ असल्याची भिती गावकऱ्यांनी व्यक्त केली होती, त्याच परिसरात हा वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

अकोला तालुक्यातील पातूर नंदापूर परिसरात व बार्शीटाकाळी तालुक्यातील पिंजर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अकोला वनक्षेत्रातील सोनखास परिसरात हा वाघ मृतावस्थेत आढळला. याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व पिंजर पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेतली. या ठिकाणी डॉक्टरांचे पथकही पोहोचले असून, वाघाच्या मृतदेहाचा पंचनामा केला जात आहे. शवविच्छेदनानंतरच वाघाच्या मृत्यूचे कारण कळू शकेल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गावकऱ्यांची भिती निघाली खरी

अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात बिबट व इतर प्राण्यांचा मोठ्याप्रमाणावर वावर आहे. मात्र, आतापर्यंत कधीही या परिसरात वाघाचे दर्शन झाले नव्हते. मात्र, गेले काही महिन्यांपासून या परिसरात पट्टेदार वाघ फिरत असल्याचे अनेक गावकऱ्यांनी बघीतले होते. त्याबाबत वनविभागालाही माहिती देण्यात आली होती. मात्र, वनविभागाने गावकऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही. या परिसरात वाघ येऊच शकत नाही, असा दावाही करण्यात आला होता. आता याच परिसरात मंगळवारी मृतावस्थेत वाघ आढळून आल्याने गावकऱ्यांची भिती खरी असल्याचे सिद्ध झाले आहे. काटेपूर्णा अभयारण्याच्या बाहेर असलेल्या या वन परिसरात चार बिबटही फिरत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT